

उंडवडी, ता. १५ : गोजुबावी (ता. बारामती ) येथील न्यू इंग्लिश राष्ट्रीय हिंदी दिन उत्साहात साजरा झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक बाळू भिसे होते. यावेळी विद्यार्थिनी संस्कृती घायाळ, पूजा मोरे, प्रतीक्षा कोलवडकर यांनी आपल्या भाषणातून हिंदी भाषेचे महत्त्व सांगितले.
हिंदी विषय शिक्षिका प्रीतम पानसरे व हिंदी विभाग प्रमुख अहमद शेख यांनी हिंदी भाषेचा जागतिक दर्जा, मानवी जीवनात भाषेचे महत्त्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक भिसे यांनी पानसरे, वर्षा खंडागळे व शेख यांना गुलाब पुष्प देऊन हिंदी दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन साळुंखे यांनी केले. यावेळी लीना सोनटक्के, अर्चना अनारसे व आशिष कांबळे हे उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.