बारामतीच्या जिरायती भागात मजूर टंचाई

बारामतीच्या जिरायती भागात मजूर टंचाई
Published on

उंडवडी, ता. १५ : बारामती तालुक्याच्या जिरायती भागात खरीप हंगामात मोठ्या प्रमाणावर मजूर टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. तर काही शेतक-यांनी मजूर टंचाईवर मात करण्यासाठी एकमेकात सावडीचा ओरंगळीचा करण्याचा जुना पारंपरिक मार्ग सुरू केला आहे.

बारामतीच्या जिरायती भागातील उंडवडी सुपे, कारखेल, सोनवडी सुपे, जळगाव सुपे, अंजनगाव, बऱ्हाणपूर, खराडेवाडी, उंडवडी कप, गोजुबावी व जराडवाडी आदी परिसरात खरीप हंगामपूर्व व पेरण्यानंतर आवश्यक पाऊस वेळोवेळी पडला आहे. त्यामुळे खरीप हंगामातील बाजरी, मूग, उडीद, मका, कांदा आदी पिके शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर घेतली आहेत. खरिपातील बहुतांशी पिके अंतिम टप्प्यांत आली असून आहे. बाजरी, मका व मुगाची काढणी एकाच वेळी सुरू झाली आहे.त्यामुळे शेतकरी सुगीच्या कामात गुंतले आहेत. तर दुसरीकडे शेतीकामासाठी मजुरांची भीषण टंचाई जाणवू लागली आहे.

बाजरी आणि मका कापणीसाठी महिलांना तिनशे ते साडे तिनशे रुपये मजुरी दिली जात आहे. तर पुरुष मजूर पाचशे ते साडे पाचशे रुपये मजुरी घेत आहेत. तर काही मजूर एकत्रित येऊन ठेका पद्धतीने शेतातील कामे करत आहेत. मात्र, खरीप हंगामात शेतातील कामासाठी मजूर मिळवणे मोठे मुश्कील झाले आहे. त्यामुळे काही शेतकरी एकमेकांच्या कामाला जाऊन सावड पद्धतीने ओरंगळा करत आहेत.

मजूर मिळविण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये स्पर्धा
उंडवडी सुपे परिसरात शेतीला पूरक असलेला दुग्धव्यावसाय मोठ्या प्रमाणावर शेतकरी करतात. जनावरांना वर्षभर हिरवा चारा उपलब्ध व्हावा, यासाठी मका या पिकाची लागवड केली जाते. सद्या बहुतांशी मकेची पिके कापणीला असून शेतकरी मकेपासून मूरघास तयार करू ठेवत आहेत. याकामासाठी ट्रॅक्टरचलित कुटी मशिन व मजुरांची आवश्यकता असते. याकामासाठी देखील कुटी मशिनसह मजूर मिळविण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये स्पर्धा लागल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com