उंडवडी परिसरात जिओ नॉट रिचेबल
उंडवडी, ता. १२ : उंडवडी सुपे (ता. बारामती) परिसरात गेल्या दोन दिवसांपासून जिओ कंपनीचे मोबाईल सेवा बिघडली आहे. त्यामुळे जिओ ग्राहकांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
उंडवडी सुपे, उंडवडी कडेपठार, जराडवाडी, खराडेवाडी, सोनवडी सुपे आदी गावाच्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून जिओ कंपनीच्या नेटवर्कमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. त्यामुळे जिओच्या ग्राहकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. फोन केल्यानंतर किंवा आल्यानंतर स्पष्ट आवाज न येणे, इंटरनेट हळू गतीने चालणे, नेटवर्क असून, देखील फोन न लागणे अशा अनेक अडचणींचा सामना जिओ ग्राहकांना करावा लागत आहे.
उंडवडी कडेपठार व उंडवडी सुपे या दोन गावात जिओ कंपनीच्या मोबाईल नेटवर्कसाठी उंच मनोरे उभारण्यात आले आहेत. या दोन गावातील मनोऱ्यावरून परिसरातील मोबाईल धारकांना नेटवर्क मिळते. मात्र, संपूर्ण वर्षभरात सातत्याने जिओच्या नेटवर्कमध्ये तांत्रिक बिघाड होत आहे. त्यामुळे जिओ ग्राहक चांगलेच वैतागले आहेत. जिओ कंपनीच्या मोबाईल सेवेला वैतागून अनेकांनी आपले सिमकार्ड इतर कंपनीत बदलून घेतले आहे. तसेच काहीजण सिम कार्ड बदलण्याच्या तयारीत आहेत.
सेवा पूर्ववत करण्याची मागणी
जिओच्या तांत्रिक बिघाडाचा फटका बॅंक, पतसंस्था, पेट्रोल पंप तसेच, किराणा दुकादारांनाही बसला आहे. त्यामुळे जिओचा तांत्रिक बिघाड तातडीने दुरुस्ती करून मोबाईल सेवा पूर्ववत करण्याची मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

