मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात
सोनवडी सुप्यात कालवड ठार

मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सोनवडी सुप्यात कालवड ठार

Published on

उंडवडी, ता. १२ : सोनवडी सुपे (ता. बारामती) येथील शेतकरी हारुण अहमद सय्यद यांच्या तीन कालवडीवर मोकाट कुत्र्यांनी हल्ला केला. यामध्ये एक कालवड जागीच ठार झाली, तर दोन कालवडी जखमी झाल्या आहेत. ही घटना बुधवारी (ता. १२ ) सकाळी सहाच्या दरम्यान घडली.
सोनवडी सुपे परिसरात मोकाट कुत्री पशुपालक शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. येथील शेतकरी हारुण सय्यद यांनी चार ते पाच महिन्यांपूर्वी काष्टी येथील बाजारातून चार छोट्या, जर्सी कालवडी व दोन गावराण कालवडी चाळीस हजार रुपयांना विकत आणल्या होत्या. या सर्व कालवडी घराजवळील शेतात बांधल्या होत्या. मात्र, बुधवारी सकाळी सहाच्या दरम्यानसय्यद यांच्या कालवडीवर दहा ते पंधरा मोकाट कुत्र्यांनी हल्ला चढविला. त्यात एक कालवड जागीच ठार झाली, तर दुसऱ्या जर्सी कालवडीच्या मागील पायाला, तसेच तिसऱ्या गावरान कालवडीच्या कानाला चावा घेऊन जखमी केले.
या घटनेदरम्यान गावातील सामाजिक कार्यकर्ते दत्ता साळुंखे बाजूच्या रस्त्याने जात होते. यावेळी त्यांना कुत्र्यांचा कालवडीवर होत असलेला हल्ला लक्षात आल्याने त्यांनी मोठ्या शिताफीने कुत्र्यांना हुसकावून लावले. त्यामुळे इतर कालवडींचे प्राण वाचले. या घटनेत हारुण सय्यद यांचे आठ ते दहा हजार रुपयांचे नुकसान झाले.
एकूणच पशुपालक शेतकऱ्यांच्या पशुधनाच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी मोकाट कुत्र्यांनी सय्यद यांच्याच दोन शेळ्या मारल्या होत्या. त्यामुळे परिसरातील मोकाट कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी होऊ लागली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com