जलसंवर्धन उपक्रमात ‘शिवनगर विद्या’च्या विद्यार्थ्यांचे श्रमदान
उंडवडी, ता. १४ : जळगाव सुपे (ता. बारामती) येथे माळेगाव येथील शिवनगर विद्या प्रसारक मंडळाच्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या १७० विद्यार्थ्यांसह प्राध्यापकांनी पाणी
फाउंडेशन व अटल भूजल योजनेच्या जलसंवर्धन उपक्रमात घेऊन श्रमदानातून विविध कामे केली.
जळगाव सुपे येथे पानी फाउंडेशनच्या व अटल भूजल योजनेच्या सहकार्याने गावात जलसंधारण, मृदसंवर्धन आणि पर्यावरणपूरक उपक्रम राबवले जातात. या मोहिमेचा एक भाग म्हणून शिवनगर विद्या प्रसारक मंडळाच्या विद्यार्थ्यांसह प्राध्यापकांनी श्रमदान करत विविध जलसंधारण कार्ये केली. यामध्ये जलतारा प्रकल्प, शोषखड्डे भरणे, ओढ्यातील रिचार्ज ट्रेंच कम शाफ्ट दुरुस्ती, बांध बंदिस्ती, साफसफाई व ग्रामस्थांमध्ये जलजागृती अभियान राबविणे इत्यादी उपक्रमांमधे सहभाग घेतला.
पानी फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांना जलसंधारण आणि पर्यावरणपूरक उपयोजनांचे महत्त्व समजावून सांगितले. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक कार्याची जाणीव निर्माण झाली असून त्यांना प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळाली. संस्थेचे प्राचार्य संदीप शहा व प्राध्यापक मंडळाने या सामाजिक बांधिलकीच्या कार्यासाठी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
या उपक्रमादरम्यान इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, माळेगाव चे (बु) विद्यार्थ्यांनी व विद्यार्थी तसेच प्राध्यापक शुभांगी लाड, अमित शेलार, अतुल मोरे, पुरुषोत्तम पवार, भैरवी कदम, विशाल गायकवाड, विपुल तावरे, स्नेहा बाबर यांनी सहभाग घेतला.
या कार्यक्रम प्रसंगी सरपंच मनीषा खोमणे ग्रामसेविका दीपाली हिरवे, पानी फाउंडेशनचे समन्वयक पृथ्वीराज लाड, दीपक येडे, वैभव भापकर, प्रशांत जगताप, राधेश्याम खोमणे, सचिन खोमणे, अतुल ढम, राजेश सावके तसेच ग्रामस्थांनी खूप मोलाचे सहकार्य केले.
02638
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

