उंडवडी कप येथील उपक्रमात ४१३ शेतकऱ्यांना लाभ
उंडवडी, ता. ४ : उंडवडी कडेपठार (ता. बारामती) येथे महसूल विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात ४१३ शेतकऱ्यांना विविध प्रकारचे दाखले व कागदपत्रे देण्यात आले.
या उपक्रमाचा प्रारंभ बारामती पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी नंदन जरांडे यांच्या हस्ते केला.
या उपक्रमात वारसा नोंदी अंतर्गत शेतकऱ्यांना जिवंत सातबारा ४०, सामाजिक न्याय व विशेष योजना १२, जातींचे दाखले ४, उत्पन्नाचे दाखले १८४, नॉन क्रिमीलेअर ५, पुरवठा अंतर्गत लाभ ८, केवायसी ८८, कजाप ३, भूमिहीन दाखले २५, आधार अपडेट ४१ असे एकूण ४१३ शेतकऱ्यांना हे लाभ देण्यात आले.
या उपक्रमात त्वरित दाखले, आधार अपडेट आदी लाभ गावातच मिळाल्याने शेतकऱ्यांचा वेळ, श्रम व पैसा वाचल्याने लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केले. दरम्यान, मान्यवरांच्या हस्ते आपटे, गुलमोहर, अर्जुन, वड या ६४ झाडांचे वृक्षारोपण केले. शशिकांत भापकर यांनी सूत्रसंचालन व आभार मानले.
या वेळी उंडवडी कपचे मंडल अधिकारी चेतन पोळ, सरपंच रूपाली जराड, अजित जराड, सदस्य आशा बनकर, रेखा कुचेकर, ग्राम महसूल अधिकारी प्रतीक्षा कोरपड, अश्विनी मारणे, सविता महानवर, सरिता मरस्कोल्हे, दत्तात्रेय तलवार, प्रवीण भगत, नितीन किर्दक, विस्तार अधिकारी भागवत, मुख्याध्यापक वल्लभ चौधरी, ग्रामसेवक अजित जराड, मेडदचे सरपंच गणेश काशीद, सावंतवाडीचे पोलिस पाटील नितीन गटकळ, मच्छिंद्र मुलमुले आदींसह शेतकरी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.