शेळीपालनातून तरुणाचा आर्थिक आत्मनिर्भरतेकडे प्रवास

शेळीपालनातून तरुणाचा आर्थिक आत्मनिर्भरतेकडे प्रवास

Published on

उंडवडी, ता. ३१ : नोकरीसाठी मुंबईसारख्या शहरातील धकाधकीचे जीवन जगण्यापेक्षा गावी येऊन शेतीपूरक व्यवसायातून स्वतःचा मालक होण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या काऱ्हाटी (ता. बारामती) येथील उच्चशिक्षित तरुणाने शेळीपालनात आपला जम बसवून एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. त्याने ७० ते १२५ किलो वजनाचे बोकड विक्रीतून लाखोंचे उत्पन्न मिळविले आहे.

गावाकडे परतलेला तरुण, शिक्षणाने ग्रॅज्युएट आणि नोकरी सोडून स्वतःच्या शेतात व्यवसाय सुरू केलेला ही ओळख आहे योगेश ज्ञानदेव जाधव यांची. मात्र, २०२२ मध्ये केवळ १२ शेळ्यांपासून सुरू झालेला त्यांचा शेळीपालनाचा उपक्रम आज तब्बल ३५ शेळ्यांपर्यंत पोहोचला आहे. यामध्ये जातीवंत पाच बोकडांचा समावेश आहे. या व्यवसायातून तो वार्षिक ५ ते ८ लाख रुपयांचे उत्पन्न मिळवत आहे. यामुळे त्याची आता आर्थिक आत्मनिर्भरतेकडे वाटचाल सुरू आहे.

दरम्यान, योगेश जाधव याने समाज माध्यमावर विक्रीचे नियोजन करण्यात आले आहे. चांगल्या प्रकारे चारा व्यवस्थापन करण्यात आले आहे. तसेच ते वेळोवेळी शेळ्यांना जंतूनाशक लसीकरण करून घेत आहेत.

शेडवरच ऑनलाइन पद्धतीने विक्री
शेळीपालन सुरू करण्यापूर्वी प्रशिक्षण घेतल्यानंतर योगेश यांनी राजस्थान येथून राजस्थानी कोटा जातीच्या शेळ्या खरेदी केल्या. त्यासाठी तब्बल एक लाख रुपयांचा जातिवंत नर बोकड आणण्यात आला. या ब्रीडपासून दर्जेदार करडे व बोकडांची पैदास झाली. आता शेडवरच ऑनलाइन बुकिंग पद्धतीने विक्री सुरू आहे. सुमारे ७० ते १२५ किलो वजनाचे बोकड ५० हजारांपासून ते दोन लाख रुपयांपर्यंत विकले जात आहेत. यंदा बकरी ईदसाठीही त्यांनी खास बोकड विक्रीस ठेवले.

शेड व चारा व्यवस्थापन
चार गुंठ्यांत ५० बाय २० फुटांचे शेड उभारण्यात आले आहे. जमिनीवर मुरूम टाकून कोरडेपणा राखण्यात येतो. शेळ्या, बोकड व करड्यांसाठी स्वतंत्र कप्पे तयार केले आहेत. दोन एकर शेतात सुबाभूळ, नेपियर, मका, कडवळ, तुती यांसारख्या चाऱ्यांची लागवड तसेच मुरघास उत्पादनही सुरू आहे.

02925

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com