खराडेवाडी, उंडवडीत
चोरट्यांचा डाव फसला

खराडेवाडी, उंडवडीत चोरट्यांचा डाव फसला

Published on

उंडवडी, ता. १२ : बारामती तालुक्यातील खराडेवाडी आणि उंडवडी सुपे येथे बुधवारी (ता. ११) रात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातला. वर्षभरात या परिसरात ही तिसऱ्यांदा घटना घडली. यावेळी देखील गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळेच चोरट्यांचा डाव फसला.
खराडेवाडीतील भोसलेवस्ती येथील सत्यवान भोसले आणि दादा भापकर यांच्या घराचे कुलूप बुधवारी मध्यरात्री सव्वाबाराच्या दरम्यान तोडले गेले. चोरट्यांनी घरातील कपाट-साहित्य अस्ताव्यस्त केले, मात्र त्यांना काहीही मिळाले नाही. ज्या घरात लोक झोपले होते, त्या घरांना चोरट्यांनी बाहेरुन कडी लावली होती. त्याच रात्री उंडवडी सुपे येथील पालखी तळाजवळील अनिल गवळी यांच्या घराचे कुलूप चोरट्यांनी तोडले. लोक झोपलेल्या घराला कडी लावत असताना घरातील लोक दरवाजात आल्यानंतर चोरट्यांनी तिथून पळ काढला. त्यामुळे येथेही चोरट्यांचा डाव फसल्याने कोणत्याही वस्तूंची चोरी झाली नाही. ग्रामस्थांनी एकमेकांना फोन करून रात्रभर पहारा ठेवला. त्यांच्या धैर्यामुळे आणि जागरूकतेमुळेच चोरट्यांचा डाव अपयशी ठरला. तरीही, रात्री पोलिसांनी संबधित वस्तीला भेट न दिल्यामुळे गावकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.
खराडेवाडी येथील संदीप भोसले व सत्यवान भोसले म्हणाले, ‘‘रात्री चोर आल्यामुळे आम्ही प्रचंड घाबरलो होतो. गावच्या पोलिस पाटलांना कळवून देखील कोणीच आमच्याकडे आले नाही. पोलिसांनी गस्त घालायला यावे., अशी अपेक्षा होती, पण कोणीच फिरकले नाही. त्यामुळे वाड्यावस्त्यांमध्ये नाराजी आहे.’’
दरम्यान गुरुवारी सकाळी सुपे पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक जयंत ताकवणे यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळाला भेट देवून पाहणी केली व माहिती घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com