

उंडवडी, ता. ५ : खराडेवाडी (ता. बारामती) येथे शनिवारी (ता. ४) सायंकाळी पाचच्या सुमारास ट्रॅक्टर कालव्यात उलटून झालेल्या अपघातात चालक गंभीर जखमी झाला. दिलीप भगवान खराडे (वय ५५, रा. खराडेवाडी) असे जखमी चालकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खराडे हे आपल्या शेतातून जनावरांसाठी मका आणण्यासाठी गेले होते. मका ट्रॅक्टरला जोडलेल्या औजारावर ठेवण्यात आला होता. त्यासोबतच तेथील वस्तीवरील एका व्यक्तीकडून घेतलेले घराला रंग देण्यासाठीचे रंगाचे डबेही ठेवले होते. रंगाचे डबे पडू नयेत म्हणून त्यांचे लक्ष वारंवार मागे जात होते.
दरम्यान, माघारी परतत असताना शिरसाई उपसा योजनेच्या उजव्या कालव्यालगतच्या रस्त्यावरून ट्रॅक्टर चालवत असताना मागे पाहण्याच्या प्रयत्नात त्यांचे वाहनावरील नियंत्रण सुटले. परिणामी ट्रॅक्टर थेट कालव्यात कोसळून उलटला. अपघात इतका भीषण होता की ट्रॅक्टरची चाके आकाशाकडे झाली होती. गंभीर जखमी झालेल्या खराडे यांना उपचारासाठी बारामती येथील खासगी रुग्णालयात दाखल केला आहे.
03199
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.