

उंडवडी, ता. १० : बारामती तालुक्यातील जिरायती भागाला वरदान ठरलेली शिरसाई उपसा जलसिंचन योजना तत्काळ कार्यान्वित करून लाभार्थी गावांना उन्हाळी आवर्तन सोडण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
या योजनेचा उंडवडी सुपे, खराडेवाडी, कारखेल, सोनवडी सुपे, जळगाव सुपे, अंजनगाव, जराडवाडी, उंडवडी कडेपठार, गोजुबावी, बऱ्हाणपूर, साबळेवाडी, शिर्सुफळ, गाडीखेल आदी गावांना लाभ होत आहे. मात्र, सध्या या परिसरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, विहिरी व कूपनलिकांनी तळ गाठला आहे. या भागातील बहुतांश शेतकऱ्यांनी उन्हाळी हंगामात भुईमूग, कडवळ, ऊस, मका आदी चारा पिकांची लागवड केली आहे. या पिकांना पाण्याची गरज असताना पाणी उपलब्ध नसल्याने पिके सुकू लागली आहेत आहेत. या पार्श्वभूमीवर खडकवासला कालव्यातून शिर्सुफळ तलावात तत्काळ पाणी सोडून शिरसाई योजना कार्यान्वित करावी व लाभार्थी गावांना आवर्तन द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
आम्ही खडकवासला पाटबंधारे विभागाकडे पाण्याची मागणी केली आहे. येत्या दोन दिवसांत खडकवासला कालव्याचे पाणी शिर्सुफळ तलावात सोडण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर आवश्यक पाणी साठा झाल्यावर शिरसाई योजना कार्यान्वित करून लाभार्थी भागात उन्हाळी आवर्तन सोडण्यात येईल.
- अशोक शेटे, कार्यकारी अभियंता, उपसा सिंचन व्यवस्थापन विभाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.