लोणी काळभोरमधील दोन सराईत गुन्हेगार तडीपार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लोणी काळभोरमधील दोन सराईत गुन्हेगार तडीपार
लोणी काळभोरमधील दोन सराईत गुन्हेगार तडीपार

लोणी काळभोरमधील दोन सराईत गुन्हेगार तडीपार

sakal_logo
By

उरुळी कांचन, ता. १९ : लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या नोंदीवरून सराईत गुन्हेगार अमित बालाजी सोनवणे (वय २४, रा. माळीमळा, लोणीकाळभोर, ता. हवेली, जि. पुणे), गणेश बाळू भोसले (वय २०, रा. माळीमळा, महात्मा फुले नगर लोणी काळभोर, ता. हवेली, जि. पुणे) यांना पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता तडीपार करण्यात आले आहे.

वरील दोन सराईत गुन्हेगारांनी स्वतःची टोळी बनवली असून, ते वारंवार गुन्हे करीत असल्याची माहिती लोणी काळभोर पोलिसांना मिळाली होती. त्यांच्याविरुद्ध लोणी काळभोर, हडपसर, फरासखाना पोलिस ठाणे येथे खून, खुनाचा प्रयत्न, चोरी, दंगा करणे, धमकावणे, विनापरवाना घातक हत्यार बाळगणे यांसारखे गुन्हे दाखल आहेत. याबाबत लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रेय चव्हाण यांनी टोळी तडीपारीचा प्रस्ताव तयार करून पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख यांच्याकडे पाठविला होता.