मांजरीतील आरोग्य पथक लोणी काळभोर येथे स्थलांतरित करण्याची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मांजरीतील आरोग्य पथक लोणी काळभोर येथे स्थलांतरित करण्याची मागणी
मांजरीतील आरोग्य पथक लोणी काळभोर येथे स्थलांतरित करण्याची मागणी

मांजरीतील आरोग्य पथक लोणी काळभोर येथे स्थलांतरित करण्याची मागणी

sakal_logo
By

उरुळी कांचन, ता. ३० : मांजरी बुद्रुक (ता. हवेली) येथील आरोग्य पथक हे लोणी काळभोर येथे स्थलांतरित करण्यात यावे, अशी मागणी लोणी काळभोरचे सरपंच योगेश काळभोर यांनी ग्रामस्थांच्या वतीने जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे. याचबरोबर लोणी काळभोर ग्रामपंचायतच्या वतीने हे निवेदन तालुका आरोग्य अधिकारी व हवेली पंचायत समितीला देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले की, ‘‘मांजरी बुद्रूक गावची लोकसंख्या जास्त असल्याने जिल्हा परिषदेकडून आरोग्य पथक उपलब्ध करून दिले होते. परंतु हे गाव महापालिकेमध्ये समाविष्ट झाले आहे. तसेच लोणी काळभोर व कदमवाकवस्ती ही गावे पुण्यापासून काही अंतरावर आहेत. या ठिकाणची लोकसंख्या ७० हजार इतकी आहे. दोन्ही गावे मिळून एकच प्राथमिक आरोग्य केंद्र असल्याने आरोग्याच्या सुविधा पुरविणे अवघड होत आहे. त्यामुळे मांजरी ब्रुद्रुक येथील आरोग्य पथक लोणी काळभोर या ठिकाणी स्थलांतर करावे, अशी मागणी लोणी काळभोर ग्रामस्थांची मागणी आहे. त्यासाठी गुरुवारी (ता. २५) ग्रामसभेत झालेल्या चर्चेनुसार लागणारी जागा व त्यासाठीचा खर्च ग्रामपंचायत करण्यास तयार आहे. हे आरोग्य पथक लोणी काळभोर येथे स्थलांतर केल्यास येथील नागरिकांची आरोग्य सुविधेच्या बाबतीत दिरंगाई होणार नाही. तसेच वेळवेर सुविधार पुरविता येतील.’’