बॉम्बची अफवा पसरविणाऱ्या
कवडीपाट येथे अटक

बॉम्बची अफवा पसरविणाऱ्या कवडीपाट येथे अटक

Published on

उरुळी कांचन, ता. १८ : लोकांच्या मनामध्ये भितीचे वातावरण निर्माण व्हावे, समाजातील सुव्यवस्था विस्कळीत व्हावी या हेतूने ‘दादर जंक्शन रेल्वे स्थानक येथे बॉम्ब आहे,’ अशी खोटी माहिती पसरविणाऱ्या व्यक्तीला लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली आहे. योगेश शिवाजी ढेरे (रा. घर नं ११९३ गोखलेनगर, विठ्ठल रुक्मिणी- मंदिर जवळ जनवाडी, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (ता. १६) लोणी काळभोर पोलिस गस्त घालीत असताना सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास लोणी काळभोर येथील ‘जयश्री हॉटेल’ या ठिकाणी दादर जंक्शन रेल्वे रेल्वे स्थानक येथे बॉम्ब आहे, अशी अफवा पसरविणारा व्यक्ती थांबला आहे, अशी माहिती खबऱ्याच्या मार्फत मिळाली. त्या आधारे पोलिस तेथे पोचले असता अफवा पसरविणारा कवडीपाट टोलनाका परिसरातील जयश्री हॉटेलसमोर आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे मोबाईल आढळून आला. त्याची अधिक चौकशी केली असता, लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होवुन चेंगराचेंगरीमध्ये जीवितहानी व्हावी या उद्देशाने ही अफवा पसरवली, अशी कबुली आरोपीने पोलिसांना दिली. अधिक तपास लोणी काळभोर पोलिस करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.