सोरतापवाडीत वादळी वाऱ्याचा पॉलिहाऊस जमीनदोस्त

सोरतापवाडीत वादळी वाऱ्याचा पॉलिहाऊस जमीनदोस्त
Published on

उरुळी कांचन, ता. २१ : सोरतापवाडी (ता. हवेली) परिसरात काल झालेल्या वादळी वाऱ्यामुळे येथील विविध पॉलिहाऊसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी लाखो रुपयाचे कर्ज काढून पॉलिहाऊसची उभारणी केली होती. वादळी वाऱ्यामुळे पॉलिहाऊस जमीनदोस्त झाल्याने त्यातील अनेक रोपांचे मोठे नुकसान झाले आहे.

लाखो रुपये खर्च करून तयार केलेली शोभेची रोपे जागेवरच उन्मळून पडले. याबाबत येथील शेतकऱ्यांनी आमदार अशोक पवार यांना नुकसानीबाबत माहिती दिली. पवार मंगळवारी (ता. २१) सकाळी सात वाजता गावामध्ये दाखल झाले. नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांशी चर्चा करून माहिती घेतली.
यावेळी बोलताना आमदार अशोक पवार म्हणाले, की येथील नर्सरीची रोपे देश, परदेशात जातात. नर्सरी व्यावसायिक हा तरुण वर्ग आहे. सौरभ आणि संजय धुमाळ यांनी एक कोटीची रोपे होती. त्यांचे एक रोप अडीचशे ला विकले जाणार होते. त्यांचे हे झालेले नुकसान खूप मोठे आहे. नर्सरीच्या नुकसानबाबत जिल्हा अधिकारी, जिल्हा कृषी अधीक्षक, प्रांत अधिकारी यांच्याशी माझे बोलणे झाले आहे. मात्र, तहसीलदार किरण सुरवसे यांचे याकडे लक्ष दिसत नाही. तहसीलदारांबाबत शेतकऱ्यांच्या मनात रोष दिसून आला आहे. सरकारने तातडीने नुकसान भरपाई न दिल्यास येत्या १० जूनच्या पावसाळी अधिवेशनामध्ये आवाज उठवणार आहे.


यावेळी बापू चौधरी, शंकर कड, सनी चौधरी, शशिकांत चौधरी, बाळासाहेब चोरगे, जगदीश महाडीक, अनिल जगताप, नरेंद्र कड, रंजीत चौधरी, रवी कड, बंडोपंत चौधरी, विशाल काळे, सुभाष टिळेकर यांच्यासह शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माझे २१ गुंठ्याचे पॉलिहाऊस आहे तर ५ गुंठ्याचे नेट शेड आहे. वादळी वाऱ्यामुळे पॉलिहाऊसचा पूर्ण पेपर फाटला आहे. कटिंग शेडचे नुकसान झाले आहे. जवळपास दहा ते बारा लाखाचे नुकसान झाले आहे.
- विशाल चौधरी, नर्सरी व्यावसायिक

02038

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com