थेऊर येथे शिवणकाम प्रशिक्षण

थेऊर येथे शिवणकाम प्रशिक्षण

उरुळी कांचन, ता. ७ : बँक ऑफ बरोडा आरसेटी थेऊर आणि स्वयंरोजगार शिक्षण संस्था यांच्या वतीने लोणी काळभोर (ता. हवेली) येथील बचत गटाच्या ३० महिलांसाठी ३० दिवसीय शिवणकामाच्या प्रशिक्षणाचे आयोजन केले होते. या प्रशिक्षणामुळे महिलांना व्यवसाय कसा करायचा याचे योग्य मार्गदर्शन मिळाले.

संस्थेचे संस्थापक दिनेश पाटील यावेळी बोलताना म्हणाले, ‘आम्ही ग्रामीण भागातील महिलांना सशक्त बनवण्यासाठी आणि त्यांना आर्थिक स्वावलंबन मिळवून देण्यासाठी काम करत आहोत. मुख्य समन्वयक विवेक जाधव म्हणाले, की शिवणकाम हा महिलांसाठी एक उत्तम व्यवसाय पर्याय आहे आणि त्यांना घरी बसूनही पैसे कमवण्यास मदत करू शकतो.’

या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील महिलांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होण्यास मदत होईल आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनण्यास प्रोत्साहन मिळेल असे शिवणकाम प्रशिक्षक शोभा लव्हे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com