उरुळीतील येथील कुटुंबाला  
मारहाण करून दागिने लुटले

उरुळीतील येथील कुटुंबाला मारहाण करून दागिने लुटले

Published on

उरुळी कांचन, ता. २ : चाकूचा धाक दाखवत लाकडी काठ्यांनी मारहाण करत चार चोरट्यांनी घरातील सोन्याचे दागिने जबरीने हिसकावून पसार झाले. ही घटना उरुळी कांचन (ता. हवेली) येथील ढगेमळा अयोध्यानगर परिसरात मंगळवारी (ता. २) पहाटे अडीचच्या सुमारास घडली.
उरुळी कांचन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याबाबत प्रथमेश संभाजी कुंजीर (वय २३, रा. ढगेमळा) यांनी उरुळी कांचन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. ते कुटुंबीयांसह उरुळी कांचन येथील ढगेमळा अयोध्यानगर परिसरात राहण्यास आहेत. त्यांचा दुग्ध व्यवसाय आहे. मंगळवारी (ता. २) पहाटे अडीचच्या सुमारास सर्व कुटुंब झोपेत असताना फिर्यादी यांना खिडकीचा आवाज आला. त्यावेळी दरवाजा शेजारील स्लायडींगच्या खिडकीचे लॉक तोडून दरवाजाची आतील कडी उघडून चार चोरट्यांनी घरात प्रवेश केला. चोरट्यांनी कुटुंबीयांना चाकूचा धाक दाखवत काठ्यांनी मारहाण केली. त्यांच्याकडील असलेले तीन लाखाचे सोन्याचे दागिने हिसकावून घेतले. चोरट्यांकडून झालेल्या मारहाणीत फिर्यादी जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.