

उरुळी कांचन, ता. २७ : उरुळी कांचन (ता. हवेली) परिसरात झालेल्या अपघातामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू तर दुसऱ्या एका अपघातामध्ये भरधाव दुचाकीने धडक दिल्याने पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी उरुळी कांचन पोलिसांनी वाहनचालक व दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पहिली घटना भवरापूर येथील गोळीबार मैदानाजवळ घडली. मच्छिंद्र नारायण काळे (वय ५७, अष्टापूर फळीवस्ती, ता. हवेली) हे रविवारी (ता.२५) दुपारी साडेबारा वाजता बाजार आणण्यासाठी घरातून मोटर सायकलवर उरुळी कांचनला गेले. ते रविवारी घरी आले नाहीत. त्यानंतर गावातील एकाने सोमवारी (ता. २६) सकाळी साडेसात वाजता मच्छिंद्र काळे यांचा मुलगा लक्ष्मण काळे (वय २९) याला फोन करून ‘तुमच्या वडिलांचा भवरापूर येथे गोळीबार मैदानाजवळ अपघात झाला आहे’ असे सांगितले. लक्ष्मण व त्याचा भाऊ अतिश काळे तत्काळ भवरापूर येथील गोळीबार मैदानाजवळ गेले. तेथे गेल्यानंतर त्यांना वडील मच्छिंद्र काळे मृतावस्थेत पडल्याचे व त्यांची दुचाकी बाजूला पडल्याचे दिसले.
दुसरी घटना उरुळी कांचन येथे घडली. दत्तात्रेय गेनबा तुपे (वय ६१, रा. सूर्यमुखी गणेश मंदिराजवळ, तुपेवस्ती, उरुळी कांचन, ता. हवेली) हे सोमवारी (ता. २६) सायंकाळी उरुळी येथील वाघाडे हॉस्पिटल जवळून पायी जात होते. यावेळी हिरो (ग्लॅमर टी.एस. ०१/ इजे २७३८) या भरधाव दुचाकीने दत्तात्रेय तुपे यांना जोरदार धडक दिली. यामध्ये तुपे गंभीर जखमी जागीच मृत्यमुखी पडले. त्यामुळे तुपे यांचा पुतण्या किरण संजय तुपे (वय ३२) यांनी दुचाकीस्वाराविरोधात उरुळी कांचन पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.