थेऊरमधील मटका अड्ड्यावर कारवाई
उरुळी कांचन, ता. २५ : थेऊर (ता. हवेली) येथील बेट वस्ती परिसरात बेकायदेशीररीत्या मटका जुगार अड्ड्यावर लोणी काळभोर पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. या ठिकाणी जुगाराचे साहित्य, रोख रक्कम व दोन वाहने, असा एकूण २५ लाख १६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
उमेश ऊर्फ टका निवृत्ती राखपसरे (वय ५०, रा. बेटवस्ती, थेऊर फाटा), रोहीत कांबळे (वय ३२, रा. बेटवस्ती), श्याम वामन गायकवाड (वय ४७, रा. कोलवडी), अक्षय राजेंद्र चौधरी (वय २६, रा. सोरतापवाडी), ऋतीक राजेंद्र जाधव (वय २०, रा. जाधववस्ती), पांडुरंग निवृत्ती राखपसरे (वय ३७, रा. बेटवस्ती), देवराम ज्ञानोबा गायकवाड (वय ३६, रा. कोलवडी), अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.
लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेकॉर्डवरील सराईत जुगार चालक उमेश ऊर्फ टका निवृत्ती राखपसरे हा थेऊर फाटा परिसरातील बेटवस्ती येथे रविवारी (ता. २३) रात्री पावणेदहाच्या सुमारास बेकायदेशीररीत्या मटका जुगार पैशांवर खेळत असल्याची माहिती मिळाली. त्याच्या आधारे लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक बिराजदार, सोनटक्के, पोलिस हवालदार जोगदंड, आहेर, गोंगाने, जोजारे, ढमढेरे, धुमाळ, माळी यांनी सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य, रोख रक्कम, व दोन वाहने, असा एकूण २५ लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

