

उरुळी कांचन, ता. २७ : रिक्षातून येऊन चोरट्यांनी सिमेंट पाइप तयार करणाऱ्या तीन कंपन्यांमधील बायडींग तारांचे बंडल आणि पाइप मोल्डच्या लोखंडी रिंग चोरून नेल्याची घटना पेठ (ता. हवेली) गावात घडली आहे. या घटनेत चोरट्यांनी एकूण ४७ हजार ९२५ रुपये किमतीचा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी उरुळी कांचन पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यासंदर्भात कंपनी चालक सचिन भाऊसाहेब हाके (वय ३५, रा. पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पेठ येथे फिर्यादी हाके यांच्या साई एन्टरप्रायझेस सिमेंट पाइप कंपनीसह इतराच्या मालकीच्या सागर सिमेंट प्रॉडक्ट सिमेंट पाइप कंपनी व नायगाव मार्गवस्ती सुचिता स्पन पाइप या सिमेंट कंपनीतील सिमेंट पाइप तयार करण्यास लागणारे बायडींग तारा, पाइप मोल्डच्या वेगवेगळ्या मापाच्या लोखंडी रिंग, असा एकूण ४७ हजार ९२५ रुपयांचा माल चोरून नेला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.