श्रीरामनवमीनिमित्त हरिनाम सप्ताहाचे आयोजन

श्रीरामनवमीनिमित्त हरिनाम सप्ताहाचे आयोजन
Published on

उरुळी कांचन, ता. २८ : येथील उरुळी कांचन देवस्थान संस्था, भैरवनाथ सेवा समिती, ग्रामपंचायत, उरुळी कांचन व समस्त ग्रामस्थ यांच्या वतीने श्री राम जन्मोत्सवानिमित्त अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन केले आहे. श्री ग्रंथराज ज्ञानेश्‍वरी पारायण सोहळा आणि अखंड हरिनाम सप्ताह रविवार (ता. ३०) ते सोमवार (ता. ७) दरम्यान उरुळी कांचन (ता. हवेली) येथील श्रीराम मंदिरात होणार आहे.
रविवारी (ता. ३०) सुमीत महाराज मोटे यांचे प्रवचन तर कीर्तन मयूर महाराज कोंडे यांचे होणार आहे. सोमवारी मनीषा महाराज तुपे तर कीर्तन ज्ञानेश्‍वर महाराज रासकर. मंगळवारी प्रवचन निर्मला महाराज कांचन तर कीर्तन विशाल महाराज इंगळे यांचे होईल. बुधवारी प्रवचन नाना महाराज काळे यांचे तर कीर्तन ज्ञानेश्‍वरी महाराज बागूल यांचे होईल. गुरुवारी प्रवचन श्रीकृष्ण महाराज बोरकर यांचे तर कीर्तन श्यामसुंदर महाराज ढवळे यांचे होईल.
शुक्रवारी प्रवचन नीता महाराज कांचन तर कीर्तन श्रीकांत महाराज मोहोकर, शनिवारी प्रवचन प्रमिला महाराज तळेकर तर कीर्तन जयश्री महाराज येवले यांचे होईल. रविवारी (ता. ६) सकाळी १० ते १२ राम जन्मानिमित्त कीर्तन मनोहर महाराज शिनारे यांचे तसेच सायंकाळी नरहरी महाराज सांगळे यांचे कीर्तन होणार आहे. सोमवारी (ता. ७) सकाळी १० ते १२ या वेळेत ऋषीकेश महाराज नवले यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. दुपारी चार वाजता दिंडी प्रदक्षिणा होईल. काकड आरती, ज्ञानेश्‍वरी ग्रंथ वाचन, गाथा वाचन, महिला भजन, हरिपाठ, प्रवचन, हरिकीर्तन, महाप्रसाद, हरि जागर असा नित्य दिनक्रम असणार आहे. सप्ताहाचे ३८ वे वर्ष असल्याची माहिती श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीने देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com