शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल

शासकीय कामात अडथळा
आणल्याचा गुन्हा दाखल
Published on

उरुळी कांचन, ता. २८ : ग्रामसेवकाच्या शासकीय कामकाजात अडथळा आणल्याबद्दल उरुळी कांचन (ता. हवेली) येथील पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे. कुंडलिक केरबा यादव (वय ७०, रा. नायगाव, ता. हवेली) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
उरुळी कांचन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याबाबत विजया दत्तात्रेय भगत (वय ४०, रा. सासवड, ता. पुरंदर) यांनी फिर्याद दिली आहे. त्या नायगाव ग्रामपंचायत येथे ग्रामसेवक म्हणून कार्यरत आहेत. त्या शुक्रवारी (ता. २८) सकाळी साडेदहा वाजता वसुलीचे कामकाज आटपून ग्रामपंचायत कार्यालयात पोचल्या. त्यावेळी यादव हे तेथे आले. त्यांनी, ‘बुधवारी (ता. २६) झालेल्या मासिक सभेत दिलेल्या अर्जावर तुम्ही काय कारवाई केली?’ अशी विचारणा केली. त्यावर फिर्यादी यांनी, ‘१ एप्रिल रोजी होणाऱ्या मासिक सभेत याबाबत निर्णय तुम्हाला देते,’ असे सांगितले. त्यावर यादव म्हणाले, ‘तुम्ही काय काम करता? तुम्ही कशाचा पगार घेता? तुम्ही काम करत नाही. माझे, काम करा नाहीतर तुम्हाला आमच्या गावात काम करू देणार नाही. आता गावाबाहेर जाऊ देणार नाही. तुम्ही लेखी दिल्याशिवाय हलणार नाही.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com