पूर्व हवेलीत पिकांचे पंचनाचे सुरू

पूर्व हवेलीत पिकांचे पंचनाचे सुरू
Published on

उरुळी कांचन, ता. ३१ : पूर्व हवेलीतील गावांत अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतीची व पिकांची पाहणी केली असून, पिकांचे पंचनामे सुरू आहेत, अशी माहिती हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते यांनी वाघोली येथे नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाची बैठक घेतली.
पूर्व हवेलीतील सर्व गावचे सरपंच, पोलिस पाटील, ग्राममहसूल अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, कृषी अधिकारी यांना आदेश देऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करण्याच्या सूचना कोलते यांनी दिल्या आहेत.
अनुषंगाने अष्टापूर गावचे सरपंच पुष्पा कोतवाल, यशवंत सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्‍यामराव कोतवाल, सुरेश कोतवाल, माजी सरपंच कविता जगताप, ग्रामपंचायत सदस्य संजय कोतवाल, माजी उपसरपंच सोमनाथ कोतवाल, दत्तात्रय कटके यांनी गावातील नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन ग्राम महसूल अधिकारी, कृषी अधिकारी व ग्रामपंचायत अधिकारी यांना शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करावे असे जाहीर आवाहन केले.
पूर्व हवेलीत सरासरी १८० मिलिमीटर पाऊस झाला. या अति मुसळधार पावसामुळे शिंदवणे, वळती, तरडे, अष्टापूर येथील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अष्टापूर माळवाडी परिसरामध्ये देविदास कोतवाल यांच्या भुईमूग व पालक या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच शांताराम कोतवाल, बापूराव सदाशिव, हनुमंत कोतवाल, किसन कोतवाल, मारुती कोतवाल, हनुमंत राजवडे यांच्या शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अष्टापूर गावातील खोलशेत, या ठिकाणी संदीप कोतवाल, रामदास कोतवाल, दीपक कोतवाल, गोपीचंद कोतवाल, प्रभाकर कोतवाल या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com