उरुळीत डंपरच्या धडकेत महिलेचा मृत्यू

उरुळीत डंपरच्या धडकेत महिलेचा मृत्यू
Published on

उरुळी कांचन, ता. १६ : पुणे-सोलापूर महामार्गालगत उरुळी कांचन (ता. हवेली)येथील तळवाडी चौकात सोमवारी (ता. १६) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास डंपरच्या धडकेत पन्नास वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला. प्रमिला अशोक गोळे (वय ५० रा. गोळे वस्ती, उरुळी कांचन) असे या अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी डंपर चालक पांडुरंग सांवत (वय ४३ रा. पाटीलवाडा, उरुळी कांचन) याला उरुळी कांचन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, मृत महिला प्रमिला गोळे या सोमवारी (ता. १६) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास तळवाडी चौकातून पुणे-सोलापूर महामार्ग ओलांडत असताना यवतच्या दिशेने निघालेल्या डंपरची (क्र. एमएच १२ टीव्ही ३७०२) त्यांना जोरात धडक बसली. त्यात त्यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
UNK25A03037

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com