निसर्गाच्या सान्निध्यात सोरतापेश्वर मंदिर
सुवर्णा कांचन : सकाळ वृत्तसेवा
उरुळी कांचन, ता. २७ : सोरतापवाडी (ता. हवेली) येथील श्री क्षेत्र सोरतापेश्वरचे मंदिर हे पांडवकालीन शिवमंदिर आहे. सोरतापेश्वर मंदिर हे डोंगरावर आहे. भोवताली दाट झाडींनी व्यापलेले आहे. श्रावणी सोमवारी मंदिरात भाविकांची अलोट गर्दी होते. निसर्गाच्या सान्निध्यात असणाऱ्या या मंदिरात गेल्यावर मन प्रसन्न होते.
पुणे-सोलापूर महामार्गापासून ५०० मीटर सोरतापवाडी गावात सोरतापेश्वर मंदिर आहे. जमिनीपासून साधारण बाराशे फूट अंतरावर डोंगरात हे मंदिर आहे. मंदिराला दगडाच्या १३० पायऱ्या आहेत. मंदिराच्या परिसरात हाती त्रिशूल घेतलेली ध्यानधारणेत दगडावर बसलेली १२ फूट महादेवाची मूर्ती आहे. कृत्रिम पाण्याच्या कुंडातून महादेवाच्या जेठेतून गंगा वाहत आहे तर समोर ११ फूट नंदीची मूर्ती आहे. हे मंदिर छोट्या आकाराचे असून गाभाऱ्यात वज्रलेप केलेले शिवलिंग आहे. तिथेच श्री गणेशाची मूर्ती देखील आहे.
‘सोरतापेश्वर’चा आधीचा उल्लेख हा ‘सोरतापा’ असा होता. काही काळ पांडवांनी या डोंगरावर वास्तव्य केले असल्याची आख्ययिका आहे. या मंदिराच्या भोवती दरी आणि घनदाट झाडी होती. येथे नंदीची आणि पार्वतीची मूर्ती भंगलेल्या अवस्थेत सापडली. प्रतिभीमाशंकरसारखे शिवलिंग येथे मंदिरात आहे. २००७ साली सोरतापेश्वर देवस्थान सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून लोकवर्गणीतून या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला.
सोरतापेश्वर शिवलिंग पांडवकालीन असल्यामुळे शिवलिंगाची झीज झाल्यामुळे वज्रलेप केला. पंचक्रोशीतील सर्व शिवभक्त, नर्सरी व्यावसायिक, परराज्यातील भाविकांची संख्या लक्षणीय आहे. भाविकांसाठी अन्नदान, प्रवचन, कीर्तन कार्यक्रम ठेवला जातो. गर्दी असल्यामुळे पोलिस बंदोबस्त असतो. शालेय मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी रांगोळी स्पर्धा घेतल्या जातात. विश्वस्त मंडळ व ग्रामस्थांचे विशेष सहकार्य सदैव असते.
- माऊली महाराज लाड, संस्थापक अध्यक्ष व सर्व विश्वस्त मंडळ
सोयी सुविधा
- श्रावण महिन्यात दिवसभर अभिषेक सुरू
- सप्ताह, काला, कीर्तनीनिमित्त अन्नदान
- महाशिवरात्री निमित्त दर्शनाचे नियोजन
- पोलिस दलाकडून बंदोबस्त
- प्रशस्त वाहनतळ
अशी घ्यावी काळजी
- पायऱ्या चढताना उतरताना लहान मुले आणि ज्येष्ठांनी जपून चालावे.
- डोंगर असल्याने हुल्लडबाजी टाळावी.
- मंदिराचा परिसर असल्याने गर्दी टाळावी.
03139
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.