जनतेतून निर्माण झालेले असामान्य नेतृत्व

जनतेतून निर्माण झालेले असामान्य नेतृत्व

Published on

जनतेतून निर्माण झालेले असामान्य नेतृत्व

सामान्य कुटुंबात जन्म घेऊन सिव्हिल इंजिनियर ही व्यावसायिक पदवी प्राप्त करणारे राजेंद्र ज्ञानोबा कांचन म्हणजे जनतेतून निर्माण झालेले आणि हवेली तालुक्यातील उरुळी कांचनच्या इतिहासाला नवीन वळण लावणारे असामान्य नेतृत्व होय. कांचन कन्स्ट्रक्शन कंपनीच्या माध्यमातून ते गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करतात.

- ह.भ.प. अनिल जयवंत पवार, आडाची वाडी, वाल्हे (ता. पुरंदर)

महात्मा गांधींनी सर्वांगीण विकासासाठी ‘खेड्याकडे चला’ ही दिलेली हाक व डॉ. मणिभाई देसाई यांची खेड्याच्या विकासासाठी असलेली तळमळ व सर्वसामान्य माणूस हा सावकारी कर्जाच्या दुष्टचक्रातून बाहेर पडला पाहिजे, याबाबतची तळमळ पाहून राजेंद्रबापू ज्ञानोबा कांचन व त्यांच्या मित्रांनी एकत्र येऊन पतसंस्था स्थापन करावयाची ठरवले. सहकारातून समृद्धी, समृद्धीतून विकास, विकासातून स्थैर्य साधणारी संस्था, असं बिरुद सार्थपणे मिळवणारी पतसंस्था म्हणून डॉ. मणिभाई देसाई ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची ओळख महाराष्ट्र राज्यात आहे.
पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र कांचन यांची दूरदृष्टी, काटेकोर नियोजन, संचालक मंडळाची साथ, प्रामाणिक तंत्र कुशल सेवक वर्ग आणि समाजसेवेचा वारसा जपत आज डॉ. मणिभाई देसाई सहकारी पतसंस्था महाराष्ट्र राज्याची अर्थवाहिनी झाली आहे. संस्थेच्या राज्यामध्ये ११ शाखा कार्यरत असून, त्यापैकी ४ शाखा स्वमालकीच्या जागेत आहेत. संस्थेचे वसूल भागभांडवल १३ कोटी १६ लाख रुपये, ठेवी ३२२ कोटी रुपये, कर्जवाटप २३५ कोटी रुपये असून, गुंतवणूक ११८ कोटी रुपयाची आहे. ढोबळ नफा ६ कोटी रुपये व निव्वळ नफा ४ कोटी ७५ लाख रुपये आहे. संस्थेचा ऑडिट वर्ग पहिल्यापासून ‘अ’ राहिला आहे.
सामाजिक बांधिलकी म्हणून संस्थेच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात. डॉ. मणिभाई देसाई यांच्या जयंतीनिमित्त 27 एप्रिल रोजी रक्तदान शिबिर व सर्वांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले जाते. वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केला जातो. इयत्ता दहावी व बारावीमध्ये विशेष प्राविण्य प्राप्त केलेल्या सभासदांच्या पाल्यांचा गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ, तसेच त्यांच्यासाठी मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित केले जाते. संस्थेच्या कार्यक्षेत्रातील मंदिरांना देणगी स्वरूपात आर्थिक मदत केली जाते. सभासदांनाही वैद्यकीय कारणासाठी आर्थिक मदत केली जाते. संस्था राष्ट्रीय आपत्तीग्रस्तांसाठीही मदत करण्यास तत्पर असते. संस्थेने भूकंपग्रस्तांना, पूरग्रस्तांना मदत केलेली आहे.
संस्थेला सहकार क्षेत्रात उत्कृष्ट व गुणवत्तापूर्ण कार्य केल्याबद्दल राष्ट्रीय सहकारी विकास निगम (एनसीडीसी) सहकार मंत्रालय, भारत सरकार यांच्यातर्फे दिला जाणारा पतसंस्था विभागातील राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा को-ऑपरेटिव्ह एक्सलेंस अँड मेरिट २०२३ पुरस्कार मिळालेला आहे.
पुण्यापासून सुमारे ३५ किलोमीटर अंतरावर पुरंदर, हवेली, दौंड तालुक्याच्या सीमेवर डाळिंब येथे श्री विठ्ठल मंदिर आहे. या देवस्थान ट्रस्टचे राजेंद्रबापू अध्यक्ष आहेत. प्रतिवर्षी आषाढी एकादशी यात्रेवेळी जवळपास दोन ते अडीच लाख भाविक या ठिकाणी श्री विठ्ठलाच्या दर्शनास येतात. देवस्थानला ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा मिळालेला आहे. देवस्थान ट्रस्टमार्फत सर्वसामान्य गोरगरिबांसाठी अल्प दरात लग्नसमारंभाची सोय करण्यात आली असून, प्रतिवर्षी १०० होऊन अधिक लग्न सोहळे येथे पार पडतात. राजेंद्रबापूंची दोन्ही मुले उच्चशिक्षित आहेत. राजेंद्रबापू यशस्वी होण्यामागे त्यांच्या पत्नी संगीता यांची मोलाची साथ आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com