पुणे
सोरतापवाडीत आरोग्य उपकेंद्र, वाचनालय सुरू
उरुळी कांचन, ता. ३० : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत सोरतापवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आयुष्मान आरोग्य उपकेंद्र आणि वाचनालय सुरू करण्यात आले आहे. मागील दोन- तीन वर्षांपूर्वी शासनाने येथे उपकेंद्र मंजूर केले होते.
मात्र, जागेअभावी इमारत उभारता न आल्याने हे केंद्र तात्पुरत्या स्वरूपात ग्रामपंचायतीच्या गाळ्यात सुरू केले आहे. यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भूषण जोशी, जिल्हा आरोग्य अधिकारी रामचंद्र हाकारे, गटविकास अधिकारी शेखर शेलार, तालुका आरोग्य अधिकारी, सुरेश गोरे यांनी सहकार्य केले. याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. रूपाली लोखंडे, डॉ. सुखदा कदम, सरपंच सुनीता चौधरी, ग्रामविकास अधिकारी संतोष गायकवाड, उपसरपंच विलास चौधरी आदी उपस्थित होते.

