जैविक फवारणीवर शेतकऱ्यांचा भर
उत्रौली, ता. १ : भोर तालुक्यातील वीसगाव खोऱ्यातील आंब्यांच्या झाडांना चांगला मोहर बहरला आहे. यंदा थंडी कडाक्याची पडत असल्याने मोहराकरीता पोषक हवामान आहे. अशा थंडीतील मोहोरामुळे चांगली फळधारणा होऊन आंबा उत्पादन चांगले होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा रासायनिक औषधांची फवारणी करण्याऐवजी जैविक फवारणी करण्यावर ग्रामीण भागातील शेतकरी भर देत आहे.
मावा, तुडतुडे या किडीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून दशपर्णी, तंबाखूअर्क, जीवामृत, ताकाची फवारणी टप्प्याटप्प्याने करत आहेत. यामुळे फळधारणा होण्यास मदत होणार आहे.
ताकाची फवारणी : आंब्याचा मोहोर संरक्षणासाठी १५ लिटरच्या पंपाकरिता देशी गाईचे अर्धा लिटर आंबट ताक (शक्यतो घरात तयार केलेले ताक वापरावे ते शक्य नसेल विकत आणलेल्या ताकात रात्री लिंबू पिळून विरजण लावून सकाळपर्यंत ठेवून त्याचा वापर करावा) कपभर गुळाची काकवी किंवा पावशेर गुळाचे गूळ पाणी यांचे मिश्रण मिक्सरमध्ये पेस्ट करून गाळून पंपात १४ लिटर पाणी, अर्धा लिटर ताकाची पेस्ट वापरून मोहरावर फवारणी करावी.
फवारणीचे फायदे
- ताक हे बुरशीनाशक असल्याने फूल गळ होण्याचे प्रमाण कमी होते.
- काकवी किंवा गुळाचे पाणी पानावर केलेली फवारणी चिटकून (स्टिकर) ठेवण्याचे काम करते.
- फुलावर केलेल्या फवारणीमुळे मधमाशा आकर्षित होऊन परागीकरण होते.
- फुलांचे रूपांतर फळात होऊन फलधारणा चांगली होते.
असे करा तंबाखू अर्क
- देशी गाईचे गोमूत्र ५ लिटर
- रवाळ (भुकटी) तंबाखू अर्धा किलो बादलीत भिजत ठेवावे.
- सकाळी, संध्याकाळी ढवळून घेऊन फडक्याने गाळून घ्यावे.
- १५ लिटरच्या पंपाला १५० मिली घेऊन फवारणी करावी.
असे करा दशपर्णी अर्क
- २०० लिटर प्लॅस्टिक टाकीत १७० पाणी घ्यावे
- गोमूत्र ५ लिटर, देशी गाईचे ताजे शेण दोन किलो.
- कडलिंबाची पाने- पाच किलो, रुई, गिरिपुष्पाची २, करंज २, निर्गुडी-२, टनटन -२, सीताफळ- २, लाल कन्हेर-२, पपई-२, एरंडाची २ किलो पाने आदींची दोन किलो घ्यावीत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

