रस्त्यात अडलेल्यांचा खरा आधार

रस्त्यात अडलेल्यांचा खरा आधार

Published on

उत्रौली, ता. ३ : सध्या मांढरदेव येथील श्री काळुबाई मातेची यात्रा सुरू असून राज्यभरातून लाखो भाविक विविध वाहनांनी दर्शनासाठी येत आहेत. या गर्दीच्या प्रवासात अनेकदा वाहनांचे पंक्चर होण्याच्या घटना घडतात. अशा वेळी भोर तालुक्यातील वीसगाव खोऱ्यातील वरोडी बुद्रुक येथील तरुण अनिल (लालू) बाळू तुपे हा जणू अवलियासारखा मदतीला धावून येतो. तुपे याने ‘संपदा ऑटो सर्व्हिस सेंटर’च्या माध्यमातून मोबाईलवरून आलेल्या माहितीनुसार थेट घटनास्थळी जाऊन पंक्चर काढून देण्याची सेवा सुरू केली आहे. त्यामुळे यात्रा काळात रस्त्यात अडकलेल्या भाविकांची समस्या चटकन सुटत असून अनेकांना मोठा दिलासा मिळत आहे.
भोर-मांढरदेव रस्त्यावरील खानापूर गावाच्या हद्दीत अनिल तुपे पंक्चर काढण्याचा व्यवसाय करतात. मात्र, अत्यावश्यक सेवा म्हणून वाहन कुठेही पंक्चर झाल्यास ते त्या ठिकाणीच जाऊन दुरुस्ती करून देतात. विशेषतः दुचाकी किंवा चारचाकी पंक्चर झाल्यास होणारा मनस्ताप, वेळेचा अपव्यय आणि आर्थिक नुकसान टाळण्यासाठी ही सेवा भाविकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे. अनिल तुपे (वय ४५) यांनी आठवीतच शिक्षण सोडून भोर येथे कान्हवडी गावचे माजी उपसरपंच सचिन मरगजे यांच्या गॅरेजवर काम करण्यास सुरुवात केली. वयाच्या सोळाव्या वर्षांपासून ते पंक्चर व फिटिंगचे काम करत असून या क्षेत्रात त्यांना मोठा अनुभव आहे. वडिलांनी दिलेल्या अवघ्या आठ हजार रुपयांच्या भांडवलावर खानापूर येथे टपरी टाकून त्यांनी ‘संपदा ऑटो गॅरेज’ सुरू केले. मांढरदेव घाटात किंवा वीसगाव खोऱ्यातील आडवळणी ठिकाणी वाहन पंक्चर झाल्यास चाक काढून दुसऱ्या वाहनातून खानापूर किंवा नेरे येथे नेण्याशिवाय पर्याय नसतो. अशा अडचणीच्या प्रसंगी अनिल तुपे स्वतः दुचाकीवरून घटनास्थळी पोहोचून मदत करतात.

कामाचे स्वरूप
अनिल तुपे यांना ९७६४३७५४९६ या क्रमांकावर संपर्क केल्यास ते संबंधित ठिकाणी जाऊन पंक्चर काढून देतात. यासाठी जाण्या-येण्याचा पेट्रोल खर्च आणि पंक्चरचे ८० रुपये आकारले जातात. या काळात त्यांचे गॅरेज बंद राहत असल्याने आर्थिक नुकसान होते; मात्र सामाजिक बांधिलकी म्हणून मदत केल्याचा आनंद वेगळाच असल्याचे ते सांगतात.

0126

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com