सुरेश खोपडे यांची संचालकपदी निवड

सुरेश खोपडे यांची संचालकपदी निवड

Published on

उत्रौली, ता.२४ : पाले (ता.भोर) येथील भोर तालुका शिक्षक समितीचे अध्यक्ष सुरेश खोपडे यांची पुणे जिल्हा शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेच्या संचालकपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
खोपडे हे बाजारवाडी (ता.भोर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. जिल्हा शिक्षक सेवक पतसंस्थेच्या रिक्त झालेल्या संचालकांच्या तीन जागेवरील एका जागेवर त्यांची निवड करण्यात आली. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून अध्यासी अधिकारी म्हणून संतोष तळपे यांनी काम पाहिले.
भोर तालुका शिक्षक समितीचे नेते संजय पवार, राज्य शिक्षक समिती कोषाध्यक्ष नंदकुमार होळकर, राज्य शिक्षक समिती सल्लागार महादेव माळवदकर, शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष सुनील वाघ, पतसंस्थेचे अध्यक्ष आप्पा मेंगावडे, संदीप जगताप, ज्ञानदेव बागल, मोहन धरपाळे, संजय पवार, सुनील लोणकर, गणेश सटाले, शंकर जोरकर, सचिन गायकवाड, प्रताप शिरसट यांनी त्यांचे अभिनंदन केले.

00308

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com