उत्रौलीतील वणव्यात आंब्यांच्या झाडांचे नुकसान

उत्रौलीतील वणव्यात आंब्यांच्या झाडांचे नुकसान

Published on

उत्रौली,ता.१ : उत्रौली (ता.भोर) येथे लागलेल्या वणव्यात येडवे कुटुंबाच्या वडिलोपार्जित आंब्यांच्या झाडांचे नुकसान झाल्याची घटना रविवारी (ता.१) सायंकाळी घडली. उत्रौली कान्हवडी रस्त्यालगत असलेल्या जोगमठ परिसरात अज्ञाताने लावलेल्या वणव्यातील आग परीटमाळ परिसराच्या बाजूने येडवे यांच्या माळरानाकडे आली. पाला पाचोळा व गवतामुळे झालेल्या आगीच्या डोंबामुळे आंब्याचा मोहर तसेच झाडांचे नुकसान झाले. तसेच ज्वारी पिकाला आगीचा दाह बसल्याने ज्वारी पिकाचेही नुकसान झाले आहे. सुदैवाने तेथील परिसरातील रहिवासी असलेले नटराज अय्यर यांनी सुरक्षिततेसाठी भोर नगरपालिका प्रशासनाशी संपर्क साधून आगीचा बंब बोलावून घेतला. अर्धा तासाच्या अथक परिश्रमाने आग आटोक्यात आणण्यात यश आले, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. शेतकरी कृष्णा येडवे, सतीश येडवे यांनी प्रशासनाने पंचनामा करून नुकसानभरपाईची मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com