भोरमधील वीसगाव खोऱ्यात ज्वारीच्या काढणीची लगबग

भोरमधील वीसगाव खोऱ्यात ज्वारीच्या काढणीची लगबग

Published on

उत्रौली, ता.४ : भोर तालुक्यातील वीसगाव खोऱ्यात रब्बी हंगामातील ज्वारीची काढणी, कणसे कापणी आणि भरडण्याची कामाची लगबग सुरू आहे. सद्या शेतमजूर उपलब्ध होत नसल्याने घरातीलच मंडळी ज्वारी काढणीला प्राधान्य देताना पाहावयास मिळतात. काही कुटुंबे एकत्र येत वारगुंळ्याने कामं करीत आहेत.
तापमानात झालेल्या वाढीने शेतीची कामे करताना शेतकऱ्यांना उन्हाचा बसणारा चटका बसू नये याकरिता साधारणतः पहाटे आणि सायंकाळी कुटुंबातील मंडळी ज्वारीची काढणी करीत आहेत. ज्वारीची ताठे कणसासह शेतातच दोन ते तीन दिवस वाळवून सकाळी आणि सायंकाळी ज्वारीची कणसे कापून शेतातच एका जागेवर गोळा करून ठेवतात. भरडणी यंत्राने ज्वारीची भरडणीनी केली जात आहे. त्यामानाने कमी श्रमात हार्वेस्टरच्या माध्यमातून गहू काढून त्याची भरडणी आपोआप होत असल्याने शेतकरी गव्हाची पोती घरी भरून आणत आहेत.
दरम्यान, अलीकडे महिलांना शिरवळ एमआयडीसीमध्ये काम सहजपणे उपलब्ध होत असल्याने शेतीत काम करण्यास मजूर उपलब्ध होत नाहीत, त्यामुळे घरातील सदस्य शेतीची कामे करतात, असे प्रगतशील शेतकरी विलास मांढरे यांनी सांगितले.

00351

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com