गोकवडी ग्रामपंचायतीला सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार
उत्रौली, ता. ८ : गोकवडी (ता. भोर) येथील ग्रामपंचायतीने ग्रामविकास व पंचायत राज विभाग, जिल्हा व्यवस्थापन कक्ष-ग्रामीण गृहनिर्माण, पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने अमृत महा आवास अभियान २०२२-२३ अंतर्गत प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पुणे जिल्ह्यातून प्रथम क्रमांकाचा मानाचा सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार पटकावला.
ॲग्रिकल्चर कॉलेज मैदान शिवाजीनगर, पुणे येथे शनिवारी (ता. ७) महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, उपसरपंच, सदस्य यांनी पुरस्कार स्विकारला. या प्रसंगी खासदार मेघा कुलकर्णी, आमदार शंकर मांडेकर, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे,अतिरिक्त आयुक्त पुणे नितीन माने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) भूषण जोशी,प्रकल्प संचालक शालिनी कडू, ग्रामस्थ उपस्थित होते
गटविकास अधिकारी चंद्रकांत विपट, विस्तार अधिकारी दत्तात्रेय खंडाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच रंजना पवार, उपसरपंच अशोक बांदल, माजी सरपंच भरत बांदल, ग्रामपंचायत अधिकारी नीलेश करे, कोमल जाधव, माजी सरपंच रेखा बांदल, सदस्य विश्वास बांदल, रत्ना बांदल, भारती बांदल, ग्रामरोजगार सहाय्यक हाय्याज शेख, ग्रामपंचायत कर्मचारी चंद्रभागा शेलार, ग्रामस्थ यांच्या सहकार्याने यश मिळाले.
00368
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

