बसचालक काकांची कन्या ‘पोलिस उपनिरीक्षक’
उत्रौली ता. ८ : निळकंठ (ता. भोर) येथील खासगी बसचालक प्रकाश गायकवाड यांच्या कन्येने यशाला गवसणी घालत जिद्द, चिकाटी, सातत्याच्या जोरावर पोलिस उपनिरीक्षक होऊन आदर्श निर्माण केला आहे. होतकरू मुलीने स्पर्धा परीक्षेत नेत्रदीपक यश मिळवले असून उराशी ध्येय बाळगून केलेल्या कठोर परिश्रमाला निश्चितच यश मिळते हे तिने दाखवून दिले आहे.
अंकिता गायकवाड हिचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा निळकंठ, माध्यमिक शिक्षण खानापूर येथील सरनोबत सिदोजी थोपटे विद्यालयात झाले. पदवीचे शिक्षण अनंतराव थोपटे महाविद्यालयात पूर्ण केले. ग्रामीण भागात राहून यश संपादन केल्याने गावकऱ्यांनी वाजत गाजत गुलालाची उधळण करत जल्लोषात मिरवणूक काढून पेढे वाटून आनंद साजरा केला. गावातील तरुणांनी आदर्श घ्यावा, विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे याकरिता ग्रामस्थांनी एकत्र येत मिरवणूक काढल्याचे सांगितले.
आई कमल गायकवाड या घरकाम करून जिरायती शेती करत आपल्या प्रपंचाला हातभार लावत आहेत. भाऊ अनिकेत गायकवाड वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहे. आपल्या आई-वडिलांचे कष्ट पाहत मोठ्या झालेल्या अंकिताने आपल्या आई वडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी महाविद्यालयीन शिक्षणाबरोबरच एमपीएससीचा अभ्यास करून मुंबई पोलीस झाल्यावर एमपीएससीचा अभ्यास सरू ठेवत यश संपादन केले.
कष्टाची पोचपावती
गेली ३० वर्षे घर, प्रपंच, मुलांच्या पालन पोषणासाठी भारतातील विविध राज्यांमध्ये खासगी टुरिस्ट बसवर चालक म्हणून कार्यरत आहे. या कामामुळे सहा सहा महिने मुलांची भेट होत नव्हती. गेले दोन तप केलेल्या कष्टाची पोचपावती मुलीने दिली हे सांगताना प्रकाश गायकवाड भावुक झाले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

