वरोडीतील वणव्यामध्ये लाखो रुपयांची नुकसान

वरोडीतील वणव्यामध्ये लाखो रुपयांची नुकसान
Published on

उत्रौली, ता. १५ : वरोडी खुर्द (ता. भोर) येथील धनावडेवाडी, शेरताठी परिसरात बुधवारी (ता.१५) सकाळी १० च्या सुमारास वणवा लागला. यामध्ये आंबा, जांभूळ, फणसाची झाडे तसेच बांबू बेटाला आग लागली. यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपांचे नुकसान झाले आहे.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, वणव्यात शेतकरी लक्ष्मण भिलारे यांचे दोन आंबे तसेच चार जांभळांची झाडे, वसंत वरे यांचे नऊ हापूस आंबा, कृष्णा वरे एक फणस, दोन आंबा, गोपाळ वरे दोन जांभूळ, एक आंबा, सर्जेराव वरे चार आंबा, जगन्नाथ वाडकर बांबूचे बेट, अरुण वरे बांबू बेट असे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. याच बरोबरच अनेक शेतकऱ्यांचे बांधावरील गवत, आंब्याची झाडे, करवंदाच्या जाळ्या आगीत भस्मसात झाल्या. शासनाने तातडीने पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

00498

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com