उत्रौलीतील मेळाव्यात विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प

उत्रौलीतील मेळाव्यात विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प
Published on

उत्रौली, ता.२८ : उत्रौली (ता.भोर) येथे पहिलीत दाखल होणाऱ्या बालकांसाठी मंगळवारी (ता.२८)
शाळापूर्व तयारी मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी विद्यार्थ्यांचे औक्षण करून त्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
मेळाव्यात विद्यार्थ्यांच्या मानसिक, शारीरिक, बौद्धिक, गननपूर्व क्षेत्रांची चाचपणी करण्यासाठी मुलांचे पालक, ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती, अंगणवाडी, शाळा यांच्यात समन्वय साधत विद्यार्थ्यांच्या मनाची तयारी करण्याकरिता मेळाव्याचे आयोजित केल्याचे मुख्याध्यापिका सविता चोरघे यांनी सांगितले.
दरम्यान, शालेय सर्वेक्षणात २३ मुले दाखलपात्र होती. प्रत्यक्षात पंचक्रोशीतील ५५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला.
या प्रसंगी पूनम शिंदे, राणी शिवतरे, अनिता सुतार, अमर उभे, शिक्षक, विद्यार्थी, पालक उपस्थित होते.

00515

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com