बिरोबावाडीत दागिन्यांसह 
६ लाख ६१ हजारांची चोरी

बिरोबावाडीत दागिन्यांसह ६ लाख ६१ हजारांची चोरी

पाटस, ता. २३ ः बिरोबावाडी (ता. दौंड) येथे अज्ञात चोरट्यांनी रात्री दीडच्या सुमारास प्रवेश करीत कपाटातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम अशी एकूण सहा लाख ६१ हजारांची चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत दादा येडे यांनी पाटस पोलिस चौकीत फिर्याद दिली. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक सलीम शेख यांनी माहिती
दिली.
बिरोबावाडी येथे फिर्यादी दादा येडे यांचे राहते घर आहे. मंगळवारी (ता. २१) रात्री घरातील सर्व सदस्य झोपले होते. रात्री दीडच्या सुमारास दोन अज्ञात चोरट्यांनी घरातील मुख्य खोलीचा शिताफीने दरवाजा उघडून आत प्रवेश केला. त्यांनी फिर्यादी यांचा मुलगा व सून झोपलेल्या खोलीत प्रवेश केला. त्यावेळी चोरट्यांनी बाजूच्या कपाटाचा दरवाजा उघडला. कपाटातील सोन्याचे वेगवेगळ्या प्रकारचे एकूण दहा तोळ्याचे दागिने व रोख रक्कम घेतली. कोणीतरी पळत असल्याचा आवाज आल्याने घरातील मंडळींना अचानक जाग आली. घरातील व्यक्तींनी आरडा-ओरडा करताच चोरट्यांनी धूम ठोकली. या वेळी कपाटात पाहिले असता, त्यामधील दहा तोळे सोने व रोख रक्कमेसह एकूण ६ लाख ६१ हजारांची चोरी झाल्याचे लक्षात आले. याबाबत माहिती मिळताच पाटस पोलिस उपनिरीक्षक सलीम शेख हे पोलिस फौज फाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. दौंडचे उपविभागीय पोलिस अधिकारी स्वप्नील जाधव यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com