उसाच्या शेतात सापडला महिलेचा मृतदेह
वरवंड, ता. ७ : कडेठाण (ता. दौंड) येथे शेतात खुरपणी करणाऱ्या लता बबन धावडे (वय ४५) या महिलेचा मृतदेह उसाच्या शेतात आढळून आला. बिबट्याच्या हल्ल्यात या महिलेचा मृत्यू झाल्याचा दावा ग्रामस्थांनी व महिलेच्या नातेवाइकांनी केला आहे.
शनिवारी दुपारी लता धावडे व त्यांचे पती बबन धावडे हे शेतात काम करीत होते. अंदाजे साडेतीन वाजता बबन यांना पत्नी खुरपणीच्या शेतात दिसल्या नाही. त्यांनी त्यांना आवाज दिला. मात्र, लता यांचा प्रतिसाद न आल्याने त्यांचा शोध घेतला असता, बाजूच्या उसाच्या शेतात लता यांचा मृतदेह आढळून आला. माहिती मिळताच परीसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसरात बिबट्याचा वावर असल्याने लता यांना बिबट्याने हल्ला करून ठार केल्याचा संशय बळावला. त्यामुळे ग्रामस्थांनी तत्काळ वनविभागाला माहिती दिली. यानंतर वनविभागाचे अधिकारी, पोलिस घटनास्थळी दाखल झाले. लता धावडे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात नेण्यात आला आहे.
दरम्यान, काही दिवसांपासून बिबट्याचा परिसरात मुक्त संचार आहे. वनविभागाला वारंवार सांगूनदेखील त्यांनी ही बाब गांभीर्याने घेतली नाही. त्यामुळे एका महिलेचा नाहक बळी गेला. याला वनविभाग जबाबदार असल्याचे उपसरपंच अनिल धावडे व पोलिस पाटील सुहास दिवेकर यांनी सांगितले.
घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून, तपास सुरू आहे. त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल, असे सहाय्यक वनसंरक्षक दीपक पवार म्हणाले.
बिबट्याला जेरबंद करण्यासाठी नियमानुसार पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

