

वरवंड, ता.२६ : वरवंड (ता.दौंड) येथील महानंद डेअरी दूध भुकटी प्रकल्पातून होणाऱ्या कोळसा राखेच्या प्रदुषणाविरोधात ग्रामस्थांनी गुरुवारी (ता.२४) सकाळी थेट पुणे येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मडंळाच्या कार्यालयाच्या दरवाजातच उपोषण व घंटानाद आंदोलन केले.
यावेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा करून संबंधित प्रकल्पाच्या विरोधात कारवाइचे आश्वासन दिले. दरम्यान, महानंद दूध भुकटी प्रकल्पातून राखेचे प्रदूषण न थांबल्यास प्रदूषण निंयत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात ठोस पावले उचलणार असल्याचा इशारा प्रमुख उपोषणकर्ते संग्राम दिवेकर यांनी दिला.
प्रदूषणाबाबत संबंधित महानंद दूध भुकटी प्रकल्पाच्या व्यवस्थापकाने कोणतीच दखल घेतली नाही. त्यानंतर ग्रामस्थांनी २ जानेवारी २०२५ तसेच १३ व १७ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रदूषण नियंत्रण महामंडळ कार्यालयाकडे तक्रार दिली. मात्र, याबाबत अधिकाऱ्यांनी केवळ आश्वासनांची ऊब देऊन वेळ टाळूपणा केल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.
प्रकल्पातून राखेचे प्रदूषण कमी होत नसल्याने संग्राम दिवेकर व इतर ग्रामस्थांनी प्रदूषण महामंडळाच्या कार्यालयाच्या दरवाजातच उपोषणाचा आगाऊ मदतीच्या निवेदनाव्दारे इशारा दिला. या अनुषंगाने ग्रामस्थांनी पुणे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयाच्या दरवाजात ठिय्या मांडला.
यावेळी ग्रामस्थांनी घटांनाद व संबळ, ढोलकी वाजवून आंदोलन व उपोषण केले. यावेळी काँग्रेस पक्षाच्या वतीने पुणे शहर युवक काँग्रेस अध्यक्ष सौरभ अमराळे, हर्षद हांडे यांनी उपस्थित राहून आंदोलन व उपोषणास पाठिंबा दिला. सायंकाळी चार वाजता प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे विभागीय अधिकारी जे. एस. साळुंके यांनी उपोषण ठिकाणी भेट दिली.
यावेळी त्यांनी उपोषकर्त्यांशी चर्चा केली. महिला, लहानमुली व इतरांनी राखेच्या प्रदूषणाच्या उपद्रवाविषयी व्यथा मांडली.
यावेळी संग्राम दिवेकर, विजय दिवेकर, केशव भगत, मच्छिंद्र दिवेकर, दत्तात्रेय दिवेकर, राहुल दिवेकर, संदीप रणदिवे, सुनील टिटवे, रामचंद्र गिरमे, राजेंद्र शितोळे, लक्ष्मीबाई शिंदे, आशा दिवेकर, सुरेखा गिरमे, पुष्पा शिवरकर, भाग्यश्री दिवेकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते. याबाबत विभागीय अधिकारी जे. एस. साळुंके यांनी महानंद दूध भुकटी प्रकल्पाला या अगोदर नोटिसीने समज दिली आहे. त्यांनी राखेचे प्रदूषण न थांबविल्यास कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा दिला. यावेळी अधिकाऱ्यांनी प्रकल्पाविरोधात कारवाईचे लेखी आश्वासनाचे पत्र दिले.
00517
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.