दौंड तालुक्यात लावले नऊ पिंजरे

दौंड तालुक्यात लावले नऊ पिंजरे

Published on

वरवंड, ता. २३ : दौंड तालुक्यात बिबट्यांच्या वाढत्या उपद्रवाला लगाम लावण्यासाठी वनविभागाने कंबर कसली आहे. तालुक्यात बिबटप्रवण क्षेत्रातील गावांमध्ये बिबट्याला पकडण्यासाठी एकूण नऊ पिंजरे लावण्यात आले, अशी माहिती तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांनी दिली.
तालुक्यातील यवत, वरवंड व दौंड हे तीन वनपरिमंडलआहेत. या वनपरिमंडलाच्या कार्यक्षेत्रात एकूण ५० पेक्षा जास्त बिबट्यांचा अधिवास स्पष्ट आहे. मागील काही दिवसापासून बिबट्यांचा मुक्त संचार व उपद्रव वाढला आहे. पाळीव प्राण्यांवरील हल्ल्याचा आलेखही वाढला आहे. तालुक्यात यवत वनपरिमंडलात सर्वाधिक बिबट्यांची संख्या आहे. तसेच वरवंड वनपरिमंडल कार्यक्षेत्रात दापोडी, नानगाव, वरवंड, केडगाव, कानगाव, कडेठाण, पाटस आदी भागात तर दौंड वनपरिमंडल हद्दीत मळद, रावणगाव,देऊळगावराजे भागात बिबट्यांचा अधिवास आहे. काही दिवसापासून बिबट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. लोकवस्तीत बिबट्यांचे पाळीव प्राण्यांवर हल्ले वाढले आहे. यामध्ये महिनाभरात घोडा, शेळ्या, मेंढ्या, कुत्रे,पारडू, रेडकू आदींचा मृत्यू झाला. शेतशिवारात खुलेआम बिबट्यांचे दर्शन होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वनविभागाने तत्काळ पिंजरे लावून बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिक तसेच आजी-माजी आमदारांनी देखील केली. त्या पार्श्वभूमीवर दौंड तालुक्यात वनविभाग आता अॅक्शनमोडवर आला आहे.

या ठिकाणी लावले पिंजरे
नांदूर, सहजपूर, डुबेवाडी, वाळकी, दहिटणे, सोनवणेवस्ती, शिंदेवाडी, पाटस, वाखारी, कडेठाण आदी गावांत पिंजरे लावण्यात आले आहेत. या पिंजऱ्यात शेळी,कोंबडी आदी भक्ष्य ठेवण्यात आले आहे. पिंजऱ्यावर लक्ष ठेवण्यासाठी वनपथक गस्तीवर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com