पाटस येथे पीएमपीएल बस सेवा सुरू

पाटस येथे पीएमपीएल बस सेवा सुरू

Published on

पाटस, ता. २६ ः पाटस (ता. दौंड) येथे बुधवारी (ता. २६) पीएमपीएल बस सेवा सुरू करण्यात आली. हडपसर ते पाटस, तसेच पाटस- हडपसर, अशी पाटी असणारी दैनंदिन बस धावणार आहे. या सेवेमुळे परिसरातील विद्यार्थी, महिला, नागरिक, नोकरदार, तसेच ज्येष्ठ नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
मागील दोन वर्षापूर्वी हडपसर ते कुरकुंभ अशी पीएमपीएल बस सेवा सुरू केली होती. मात्र, ही सेवा काही कारणास्तव बंद झाली होती. सध्या ही बससेवा हडपसर- वरवंड अशी सुरू होती.
मात्र, पाटस येथून रोटी, हिंगणीगाडा, बिरोबावाडी, कानगाव, कुसेगाव येथील अनेक प्रवासी पुण्याला ये- जा करीत असतात. प्रवाशांची संख्या पाहता बससेवा पाटसपर्यंत सुरू करावी, अशी ग्रामस्थांची मागणी होती. याबाबत अनेकांनी पीएमपीएल विभागाला लेखी पत्र देऊन पाटसपर्यंत बससेवेची मागणी केली. अखेर याची दखल घेत पीएमपीएल विभागाच्या अधिकाऱ्यांनी हडपसर ते वरवंडपर्यंत असणारी बससेवा एक थांबा पुढे घेऊन ती हडपसर ते पाटस अशी करण्याचा निर्णय घेतला.
ग्रामस्थांच्या वतीने बसची फुलाच्या हारांनी सजावट करून पूजन करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थ, पीएमपीएल अधिकारी आदी उपस्थित होते.
याबाबत हडपसर पीएमपीएल बस डेपोचे वरिष्ठ समयपाल बाळासाहेब थोरात म्हणाले, ‘‘हडपसर ते पाटस या नव्या बससेवेत चौदा बस धावणार आहे. दर २० मिनिटांनी बस सुटणार आहेत. रात्रीच्या वेळी पाटस येथे तीन बस मुक्कामी थांबणार आहेत.’’

00618

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com