भाजपच्या शहर सरचिटणीसपदी कळमकर

भाजपच्या शहर सरचिटणीसपदी कळमकर
Published on

भाजपच्या पुणे शहर सरचिटणीसपदी गणेश कळमकर निवड करण्यात आली. पुणे शहर भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी या निवडीचे पत्र

नुकतेच कळमकर यांना दिले.यापुर्वीही कळमकर यांनी भाजपच्या शहर संघटनेत उपाध्यक्षसह विविध पदांवर कामे केलेले आहे. माजी नगरसेविका ज्योती कळमकर यांचे ते पती असून नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांची कोथरूड मतदार संघाच्या संयोजकपदी निवड करण्यात आली होती. बाणेर, बालेवाडी,पाषाण परिसरात पक्षाला मिळालेल्या भरघोस मतदानात त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे.

'पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवून मला शहर संघटनेत विविध पदांवर काम करण्याची संधी दिली असून भविष्यातही सर्वांना एकत्र घेऊन शहरातील विकास कामांना गती देण्यासह पक्ष संघटना वाढविण्यात महत्वपूर्ण योगदान देणार' कळमकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com