महापुरुषांचे बॅनर फाडणाऱ्यांना अटक

महापुरुषांचे बॅनर फाडणाऱ्यांना अटक

वडगाव निंबाळकर, ता. २२ : वडगाव निंबाळकर (ता. बारामती) येथील होळ चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले जयंतीनिमित्त लावण्यात आलेला बॅनर दगड फेकून फाडल्याप्रकरणी सहायक फौजदार भालचंद्र साळुंखे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तथापि, यामध्ये फिर्यादीच आरोपी असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी आकाश संजय साळवे, जयंत हरिश्चंद्र हिरवे, मोहन दौलत बनकर, संतोष तुकाराम हिरवे व मुकेश हनुमंत माने (सर्व रा. वडगाव निंबाळकर, ता. बारामती) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com