लोकसेवा समजून शिस्तबद्ध 
काम करा ः दर्शन दुगड

लोकसेवा समजून शिस्तबद्ध काम करा ः दर्शन दुगड

वडगाव निंबाळकर, ता. १० ः ‘‘पोलिस खात्यांमधील काम हे नोकरी न समजता लोकसेवा समजून चांगल्या आणि शिस्तबद्ध समाज निर्मितीसाठी सतत प्रयत्नशील रहा,’’ असा सल्ला आयपीएस अधिकारी दर्शन दुगड यांनी पोलिस अंमलदारांना दिला.

वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात तीन महिन्यांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर येथील अंमलदारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याचा पदभार दुगड यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन काळे यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन काळे, फौजदार नंदकुमार सोनवलकर, पांडुरंग कन्हेरी, सुपे ठाणेचे नागनाथ पाटील उपस्थित होते.
सतत समाजात वावरणारा समाजातील विविध घटकांच्या तक्रारी ऐकून घेऊन यावर योग्य त्या उपाययोजना करणारा हा पोलिस अंमलदार असतो. आपले काम निपक्षपाती केले तर बऱ्याच समस्या मिटतात. यासाठी आपले काम प्रामाणिकपणे करत रहा. अवैद्य व्यावसायिकांशी केलेली जवळीक घातक ठरते. आपल्याला मिळवणाऱ्या छोट्याशा लाभातून समाजाचे मोठे नुकसान होत असेल, तर स्वतःला आवरा आणि आपल्या आचरणाची समाज नोंद घेतो. पोलिसांची आदरयुक्त भीती लोकांमध्ये असावी. यामुळे तक्रारींचे निवारण करण्यात यश येते. पोलि‌सांचा गौरव राखला जाईल, असे वर्तन ठेवा, निवडणूक बंदोबस्त आणि तपास कामांमुळे सतत मनावर ताण येतो. यासाठी आपल्या तब्येतीची काळजी घेऊन काम करीत रहा, असे दुगड यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com