वडगावात जागेच्या हस्तांतराविना टाकीचे बांधकाम

वडगावात जागेच्या हस्तांतराविना टाकीचे बांधकाम

Published on

वडगाव निंबाळकर, ता. ११ : जलजीवन योजनेअंतर्गत वडगाव निंबाळकर (ता. बारामती) येथे सार्वजनिक पाणीपुरवठा पिण्याच्या पाण्यासाठी साठवण टाक्यांचे दोन ठिकाणी बांधकाम सुरू आहे. टाकीची बांधकामे झाली तरी बांधकाम झालेल्या जागेचे हस्तांतरण झाले नाही. यामुळे बांधकामासाठी केलेला कोट्यवधींचा खर्च बेकायदेशीर ठरू नये, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.

‘हर घर नल’ या योजनेतून प्रत्येक वाडी वस्तीवर पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठी जलवाहिनीची कामे सुरू आहेत. वडगाव मुढाळे मार्गावर सुरू असलेले जलवाहिनीचे काम सुमार दर्जाचे होत असल्याने ग्रामस्थांनी काम थांबवले होते. यानंतर आता सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या टाक्या ज्या जागेवर बांधल्या जात आहेत. त्या जागेचे ग्रामपंचायतीला हस्तांतरण झाले नसल्याची बाब पुढे आली आहे. टाकीच्या बांधकामाची जागा महसूल विभागाची आहे. याचे ग्रामपंचायतीला हस्तांतरण होणे गरजेचे आहे.
पुढील २५ वर्षाचे नियोजन लक्षात घेऊन काम व्हायला हवे, कामाची मंजुरी मिळाल्यानंतर ठेकेदारांनी घाई घाईने कामाला सुरुवात केली याबाबतची माहिती ग्रामस्थांना मिळाली नाही. बांधकामाचे इस्टिमेट, टाक्यांची साठवण क्षमता, बांधकामाचा कालावधी याबाबत ग्रामस्थ अनभिज्ञ आहेत.
गावचा पाणीपुरवठा नवीन योजनेनुसार कशा पद्धतीने होईल याची सविस्तर माहितीचा फलक लावणे गरजेचे आहे. ग्रामस्थांच्या याबाबत काही अडचणी असतील तर चालू कामातच सुचवल्या जातील. लोकसंख्येच्या प्रमाणात पाणीपुरवठ्याचे नियोजन करणे यामुळे सोपे जाईल, सध्या फक्त काम पुर्ण करण्याचा सपाटा चालु आहे. यावर नेमलेले अधिकारीही कामावर फिरकत नाही. येथिल स्मशानभूमी जवळ झालेले टाकीचे बांधकामाचा स्लॉब रात्रीच्या वेळी टाकला गेला यामुळे कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. झालेल्या बांधकामावर वेळेवर पाणी मारले जात नसल्याचे येथील रहिवाशांनी सांगितले.

टाकीच्या बांधकामाचा आराखडा ग्रामपंचायतकडे उपलब्ध नाही. जागेच्या हस्तांतरणाचा मुद्दा महत्त्वाचा असल्यामुळे याबाबत संबंधित विभागाशी संपर्क साधून कागदपत्रांची पूर्तता करण्यात येईल.
- अनिल हिरासकर, ग्रामविकास अधिकारी


02413

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.