

वडगाव निंबाळकर, ता. २७ : कोऱ्हाळे बुद्रुक (ता. बारामती) येथील नामदेवराव पाटील सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने कै. वसंतराव पवार यांच्या पुण्यस्मृतिनिमित्त २ आॅक्टॉबर रोजी येथील सिद्धेश्वर विद्यालयात जिल्हास्तरीय आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे.
तीन गटात स्पर्धा होणार असून, विजेत्या पहिल्या तीन विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभाग विनामूल्य आहे. नोंदणीसाठी विद्यार्थ्यांनी ३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी पाचपर्यंत ९९२३५९५१७१ या क्रमांकावर नोंदणी करावी, अशी माहिती वाचनालयाचे अध्यक्ष सतीश खोमणे यांनी दिली.
स्पर्धेसाठी प्रत्येक गटासाठी चार विषय ठेवण्यात आले आहेत. त्यामधील एका विषयावर विद्यार्थ्यांनी भाषण करावे. विविध गटातील विषय पुढीलप्रमाणे- लहान गट- पहिली ते चौथी- माझा आवडता उत्सव, येरे येरे पावसा, माझा छंद, मला काय वाटते.
मध्यम गट- पाचवी ते सातवी- आजची कुटुंब व्यवस्था आणि संस्कार, संत अवतार होती..याचसाठी अंधारात दिवटी लावावया, शेतकरी नसेल तेव्हा, मी पुस्तक प्रेमी. मोठा गट- आठवी ते दहावी- स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतर आरक्षणाची गरज आहे काय? रिल्स् स्वैराचाराला आमंत्रण तर नाही ना? लग्न एक ज्वलंत समस्या, राजकारणी लोक किती खरे अन् किती खोटे?
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.