‘वडगाव निंबाळकर मार्गावरील गतिरोधकावर पांढरे पट्टे मारावेत’
वडगाव निंबाळकर, ता. ५ ः वेगवान वाहनांपासून सुरक्षितता मिळावी, यासाठी नीरा-बारामती मार्गावरील वडगाव निंबाळकर (ता. बारामती) गावठाण भागात बसवलेले गतिरोधक वाहनांसाठी धोकादायक ठरू लागले आहेत. उंच बनवलेल्या गतिरोधकांना पांढऱ्या रंगाचे पट्टे मारावेत, अशी मागणी होत आहे.
गेल्या सहा महिन्यांपूर्वी वडगाव निंबाळकर येथील नीरा-बारामती मार्गावरील बस स्थानक ते पोलिस ठाणे या भागातील रस्ता रुंदीकरणाची काम झाले. प्रशस्त रस्ता झाल्यामुळे वाहनांचा वेगही वाढला. परिणामी अपघातांची संख्या वाढू लागली. ग्रामस्थांच्या मागणीवरून शाळेच्या परिसरात गतिरोधक बसविले. गावठाण भागात दर ५० मीटर अंतरावर सुमारे पाच गतिरोधक बसविले आहेत. वाहनांच्या वेगावर नियंत्रण येण्यासाठी बसविलेली गतिरोधक उंच झाल्यामुळे अडथळा ठरू लागले आहेत. रात्रीच्या वेळी मोठी वाहने गतिरोधकावरून गेल्यानंतर मोठा आवाज होतो. आजूबाजूच्या नागरिकांना याचा त्रास होत आहे. पांढऱ्या रंगाचे पट्टे मारले नसल्यामुळे गतिरोधक दिसून येत नाही. यामध्ये अचानक ब्रेक दाबणाऱ्या वाहनाला वेग आवरताना कसरत होते. यातून अपघात झाले आहेत. प्रखर उन्हातून सावलीत आल्यानंतर झाडाखाली लावलेली गतिरोधक दिसून येत नाहीत. परिणामी अपघात होत आहेत. लावलेले गतिरोधक उंची कमी करावी आणि पांढऱ्या रंगाचे पट्टे मारावेत, अशी मागणी सुनील माने, नितीन शिंदे, हनुमंत साळुंखे यांनी केली आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे ग्रामपंचायतीच्या वतीने पत्र दिले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

