होळ येथे बॅंकेत चोरीचा प्रयत्न

होळ येथे बॅंकेत 
चोरीचा प्रयत्न
Published on

वडगाव निंबाळकर, ता. १८ : सेंट्रल बॅंकेच्या होळ (ता. बारामती) शाखेत चोरीचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी (ता. १७) मध्यरात्री घडली.
नीरा- बारामती मार्गावर दहा फाटा येथील आनंद विद्यालयाजवळ असलेल्या बँक शाखेतील इमारतीच्या मागील बाजूच्या खिडकीचे गज गॅस कटरने कापून चोरट्यांनी बॅंकेत प्रवेश केला. बॅंकेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची छेडछाड केली. त्यानंतर लॉकर तोडण्याचा प्रयत्न झाला. परंतु, बॅंकेची तिजोरी मजबूत असल्याने चोरीचा प्रयत्न फसला. मंगळवारी (ता. १८) बॅंक कर्मचारी कामावर आले असताना पाठीमागील बाजूच्या खिडकीचे गज काढलेले दिसून आले. वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन काळे व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com