मैत्रिणीचे चित्रीकरण करून ब्लॅकमेलिंग

मैत्रिणीचे चित्रीकरण करून ब्लॅकमेलिंग

Published on

वडगाव निंबाळकर, ता. ३ : महाविद्यालयीन विद्यार्थिनीशी मैत्री करून विश्वास संपादन करत कॅफेमध्ये नेऊन नकळत अश्लील व्हिडिओ काढण्यात आले. त्याआधारे तिच्याकडे शरीर सुखाची मागणी करत तिला ब्लॅकमेल केल्याचा प्रकार सोमेश्वरनगर (ता. बारामती) परिसरात घडला. या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसांनी विनयभंगासह अॅट्रासिटी व माहिती तंत्रज्ञान अधिनियमानुसार सहाजणांविरोधात गुन्हा दाखल केला.
पार्थ शिंदे (रा. किल्लज, ता. तुळजापूर, जि. धाराशीव), रोहन चाबुकस्वार (रा. करंजेपूल, ता. बारामती), सूरज दत्तात्रेय भोसले (रा. पुणे), हनुमंत शिंदे (रा. लातूर), विजय मोजगे (रा. किल्लज, ता. तुळजापूर) व तुषार जगदाळे (पत्ता माहित नाही), अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत १९ वर्षीय पिडीतेने दिलेल्या फिर्यादीनुसार मैत्रिणीने तिची पार्थ याच्याशी ओळख करून दिली. वाढदिवसाचे निमित्त साधून नीरा (ता. पुरंदर) येथील एका कॅफेमध्ये पीडीतेला नेले. तेथे त्याने तिच्यासोबत फोटो काढले. त्यानंतर वेळोवेळी तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. करंजेपूल येथील एका कॅफेमध्ये भेटल्यावर तिच्या नकळत तिचा व्हिडिओ काढला गेला. तो घरच्यांना पाठवण्याची धमकी देत तिला ब्लॅकमेल केले. पुढे पार्थ याने तिला ब्लॅकमेल करत व्हॉटसॲपवर व्हिडिओ का२ल केला. तिला सर्व कपडे काढण्यास भाग पाडत मोबाईलवर स्क्रीन रेकॉर्डिंगद्वारे तिचे नग्न व्हिडिओ तयार केले. तु जर रिलेशन ठेवले नाही तर हे व्हिडिओ तुझ्या नातेवाइकांना पाठवेन, अशी धमकी देत तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करत मानसिक त्रास दिला गेला.
२९ जून रोजी पार्थ, रोहन, सूरज, हनुमंत, विजय व तुषार या सर्वांनी तिची बहिण व नातेवाइकांना फोटो, व्हीडीओ पाठवले. तिच्या बहिणीला फोन केला. या मुलीने फसवले आहे, ती माझ्याशी दोन वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये असताना आणखी चार-पाच मुलांसोबत रिलेशन ठेवून असल्याचे पार्थ याने सांगितले. रोहन याने तिला फोन करून शिवीगाळ दमदाटी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
याबाबत उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड अधिक तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com