बारामतीच्या विकासाचे शिल्पकार श्री अजितदादा पवार

बारामतीच्या विकासाचे शिल्पकार श्री अजितदादा पवार

Published on

श्री अजितदादा पवार यांचा वाढदिवस केवळ एक औपचारिक कार्यक्रम न राहता, तो बारामतीकरांसाठी ‘सेवेचा संकल्प’ बनतो. पिण्याच्या पाण्यासारख्या मूलभूत गरजेच्या प्रश्नावर त्यांनी घेतलेली पुढाकाराची भूमिका, योजनांचा परिणाम आणि भविष्यातील योजनांची दिशा ही बारामती तालुक्यासाठी एक स्थायी समाधान देणारी ठरत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली, बारामतीचा जलसंपन्नतेकडे होत असलेला प्रवास खरोखरच उल्लेखनीय आहे. बारामती हे नाव जगाच्या पाठीवर विकासाचे मॉडेल म्हणून उभे करणाऱ्या आदरणीय श्री अजितदादा पवार यांच्या जन्मदिनानिमित्त मनापासून हार्दिक शुभेच्छा.


बारामती तालुक्यातील जिरायत भागातील जनतेसाठी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अनेक वर्षांपासून गंभीर होता. नीरा नदीकाठी आणि नीरा डाव्या कालव्यालगत असलेल्या बागायत भागातील गावांमधून शुद्ध पिण्याचा पाणीपुरवठा व्हावा हा प्रश्न केवळ चर्चा नाही, तर कृतीने सोडवण्याचा निर्धार उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केला आणि आज त्या प्रयत्नांचे सकारात्मक फलित तालुक्याच्या अनेक भागात दिसत आहे.

जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून तालुक्यात २३ ठिकाणी तलाव बांधणीचे काम पूर्णत्वाकडे चालले आहे. बारामती तालुक्यातील एकूण ८५ गावांना योजनेद्वारे पाणी मिळणार आहे. सध्या वेगाने गावागावातून जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. स्थानिक नागरिकांनी काम दर्जेदार करून घेण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांनी विविध जाहीर कार्यक्रमांत केले आहे आता केवळ स्थानिक नागरिकांची जबाबदारी आहे.

पाण्याच्या समस्येवर दूरदृष्टीने काम
श्री अजितदादा पवार यांनी बारामती तालुक्यातील जलस्रोत टिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी बहुआयामी योजना राबवल्या. विशेषतः उन्हाळ्याच्या काळात वाढणारी पाण्याची टंचाई लक्षात घेऊन जुन्या योजना दुरुस्त करून नव्या पाइपलाइन टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. बारामती तालुक्याच्या पश्चिम भागातील जिरायत गावांमध्ये नवीन बंधाऱ्यांमुळे भूगर्भजल पातळी वाढली असून त्यामुळे योजनांचे कार्यक्षमतेने संचालन शक्य झाले आहे.

जलसंधारण प्रकल्प
‘जलयुक्त शिवार’ योजनेतून विविध ठिकाणी शेततळ्यांची निर्मिती, बंधाऱ्यांचे बांधकाम व सांडपाण्याचे पुनर्वापर प्रकल्प राबवण्यात आले आहेत. या उपक्रमांमुळे पावसाचे पाणी अडवले गेले असून भूगर्भातील जलसाठा सुधारला आहे. विशेषता नीरा नदी आणि कऱ्हा नदीवर बांधलेले कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे आजूबाजूच्या शेतकऱ्यांना वरदान ठरले आहेत. तालुक्यातील नैसर्गिक जलस्रोतांचा योग्य वापर श्री अजितदादा पवार यांच्या दूरदृष्टीतून झाला आहे. परिणामी आज स्थानिक शेतकऱ्यांना याचा फायदा होत आहे.

सौरऊर्जेला प्रोत्साहन
विजेच्या असमर्थ उपलब्धतेमुळे पाणीपुरवठा खंडित होण्याची समस्या दूर करण्यासाठी काही भागांमध्ये सौरऊर्जा प्रकल्प हाती घेतले. यामुळे विजेची समस्या काही प्रमाणात कमी झाली. सौरऊर्जेवर चालणाऱ्या पंपांचे यशस्वी प्रयोग करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना सौरऊर्जेवरील उपकरणे वापरण्यासाठी प्रोत्साहित केले आहे. तालुक्यातील अनेक शासकीय कार्यालयात लागणारी वीज सौरऊर्जेच्या माध्यमातून उपलब्ध होत आहे. मुढाळे येथील वीज प्रकल्पाच्या शुभारंभप्रसंगी श्री अजितदादा पवार यांनी शेतकऱ्यांना आवाहन करून सौरऊर्जेसाठी प्रोत्साहित केले.

स्थानिकांच्या मूलभूत गरजा पूर्णत्वाकडे
स्थानिक नागरिकांच्या मूलभूत गरजा लक्षात घेऊन त्या पद्धतीने टप्प्याटप्प्याने विकास कामे होत आहेत मुख्यत: शैक्षणिक सुधारणा अधोरेखित करण्यासारख्या आहेत यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील तरुण नोकरीला लागले आणि मुली शिकून संपन्न झाल्या. परिणामी सर्वच कुटुंबांची आर्थिक प्रगती झाली आहे. शेती, व्यापार, व्यवसाय अशा तीनही बाबतीत समाधानाचे वातावरण आहे.

लोकसहभागातून प्रगतीकडे वाटचाल
श्री अजितदादा पवार यांनी लोकसहभागावर नेहमी भर दिला आहे. ग्रामपंचायती, महिला बचत गट, शालेय समित्या आणि स्वयंसेवी संस्था यांच्या सहभागातून राबवलेल्या योजना अधिक प्रभावी ठरल्या आहेत. यामुळे तालुक्यात सहकारी संस्थांचे जाळे विस्तारले आहे.

सामान्य नागरिकांशी संपर्क
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात श्री अजितदादा पवार यांनी सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी अधिकाऱ्यांची नेमणूक केली. संबंधित अधिकारी नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर योग्य त्या उपाययोजना करत असल्याने नागरिकांमधून समाधानाचे वातावरण आहे. विशेषता गंभीर आजारातील रुग्णांना मदत केली जाते. काही ठराविक रक्कम थेट रुग्णालयात जमा होत असल्यामुळे कुटुंबाला मोठा आधार झाला आहे.

नागरिकांचा नेतृत्वावर विश्वास
तालुक्यात होत असलेली विकास कामे पाहता नागरिकांचा श्री अजितदादा पवार यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपासून विविध ठिकाणी श्री अजितदादा पवार यांच्या विचारधारेच्या व्यक्तीला मतदान केले जाते, अनेक वेळा हे अधोरेखित झाले आहे. विरोधी गटाकडून झालेला अपप्रचार मतदानाच्या माध्यमातून नागरिकांनी खोडून काढला. श्री अजितदादा पवार यांचे सडेतोड बोलणे आणि कार्यपद्धतीने जनता प्रभावी झालेली आहे. आपल्या भागाचा नाही, तर राज्याला सक्षम नेतृत्व दिल्याचे समाधान स्थानिक नागरिकांना आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com