वडगाव निंबाळकरवर पसरली शोककळा
वडगाव निंबाळकर, ता. २८ : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनाची बातमी कळताच वडगाव निंबाळकरसह संपूर्ण परिसर सुन्न झाला. क्षणातच आनंदी गजबजलेल्या गावांवर शोककळेची दाट छाया पसरली.
ही वार्ता समजताच नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवली. रस्ते ओस पडले, चौक नीरव झाले. कोऱ्हाळे बुद्रुक, होळ, सदोबाचीवाडी या गावांत कोरोना काळातील भयाण शांतता होती.
ठिकठिकाणी नागरिक एकत्र येऊन डोळ्यांत पाणी आणि मनात असह्य वेदना घेऊन घडलेल्या घटनेबाबत चर्चा करत होते. मोबाईल, दूरदर्शन, सोशल मीडिया यांसारख्या विविध माध्यमांवरून प्रत्येक जण एकच बातमी पुन्हा पुन्हा पाहत होता. ती खरी नसावी, हीच प्रार्थना प्रत्येकाच्या ओठांवर होती.
बारामती तालुक्याच्या विकासात अजित पवार यांचे योगदान अविस्मरणीय आहे. रस्ते, पाणी, शिक्षण, आरोग्य अशा अनेक क्षेत्रांत त्यांच्या कार्याची छाप आजही जिवंत आहे. त्यांच्या अचानक जाण्याने नागरिकांच्या मनात पोरकेपणाची भावना निर्माण झाली आहे. संपूर्ण परिसर शोकसागरात बुडाला असून, ‘आपला माणूस हरपला’ अशी भावना प्रत्येकाच्या डोळ्यांतून अश्रूंनी व्यक्त होत होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

